पुणे : रिक्षा खरेदीसाठी पैसे देण्यास आईने नकार दिल्याने मुलाने शिवीगाळ करून आईच्या डोक्यात दगड मारला. गांधीनगर, पिंपरी येथे शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडला. अतुल सुगंधराव खंडागळे (वय ३०) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी विमलबाई खंडागळे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या भावाला भेटायला जाण्यासाठी गांधीनगर कमानीसमोर आल्या. त्या वेळी त्यांचा मुलगा अतुल तेथे आला. रिक्षा खरेदीसाठी त्याने पैशांची मागणी केली. पैसे देण्यास त्यांनी नकार दिला. याचा राग आल्याने मुलाने आईला शिवीगाळ करून धमकी दिली; तसेच डोक्यात दगड मारून जखमी केले. सहायक फौजदार बाळकृष्ण दळवी तपास करीत आहेत.

Pune News : फक्त पुणे शहरच नाही तर ग्रामीण भागातही मेट्रोची सेवा? वाहतूक कोंडी फोडण्यासाठी खास प्लॅन
घरात घुसून महिलेचा विनयभंग

पिंपरी : घरात घुसून गैरवर्तन करून महिलेचा विनयभंग केल्याची घटना दिघी येथे शुक्रवारी (११ ऑगस्ट) घडली. या प्रकरणी पीडित महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राजू जांभळे याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या घरात झोपल्या होत्या. त्या वेळी आरोपी फिर्यादीच्या घरात घुसला. मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून फिर्यादी महिलेचा विनयभंग केला. महिला ओरडली असता आरोपी पळून गेला. दिघी पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांशी झटापट; एकाला अटक

पिंपरी : गॅस टाक्यांमधून गॅसची चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी हटकताच त्यांच्या अंगावर धावून जात झटापट करण्यात आल्याचा प्रकार रावेत येथे गुरुवारी (१० ऑगस्ट) रात्री घडला.

विकास बिश्नोई (वय २२, रा. भगवतीनगर, सूसगाव, ता. मुळशी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलीस कर्मचारी नवीन चव्हाण यांनी या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ‘डायल ११२’ या हेल्पलाइन ड्युटीवर असताना राजलक्ष्मी सोसायटी गणेशनगर, रावेत येथून कॉल आला. त्यानुसार फिर्यादी नवीन चव्हाण आणि पोलीस कर्मचारी बेंडभर हे गणेशनगर येथे गेले. आरोपी हा फिर्यादी चव्हाण आणि बेंडभर यांच्या अंधावर धावून गेला. पोलिसांशी झटापट करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला; तसेच गॅस टाक्यांमधील गॅसची चोरी करण्याचा प्रयत्न करताना आरोपी मिळून आला. पोलीस उपनिरीक्षक रवी पन्हाळे तपास करीत आहेत.

विरोधकांनीच मणिपूरवरील चर्चा रोखली; PM मोदींचा हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here