विनायक ट्रॅव्हल्सची ही बस मुंबईहून गोव्याकडे जात होती. गगनबावड्यापासून काही अंतरावर करूळ घाटात अपघात होऊन त्यामध्ये ३ प्रवासी किरकोळ जखमी झाले. शिल्पा महेंद्र अनघन (४४), गीता राजेंद्र अनघन (५०), पिंकल वाजता कोल्हापूर मार्गे गोव्याकडे करूळ घाट सुरुवातीला उतरत असतानाच बस गटारामध्ये कलंडली.
गगनबावडा येथे आल्यावर काही वेळ ही बस थांबली होती. त्यानंतर गोव्याच्या दिशेने जायला निघाली. परंतु गगनबावडा या ठिकाणावरून निघाल्यानंतर घाटाच्या काही अंतरावर रस्त्याकडेच्या गटारीमध्ये कलंडली. दरम्यान, जखमींना रुग्णवाहिकेतून सुरुवातीस गगनबावडा आणि तेथून कोल्हापूरकडे हलवण्यात आले. चालकाचा वाहनावरील ताबा सुटताच तो बाहेर उडी मारून पसार झाला.
अपघाताचे वृत्त गगनबावडा येथील आंबेडकर चौकात समजताच ग्रा.प.सदस्य मुस्ताक वडगावे, संतोष पाटील, गुरुनाथ कांबळे आदींनी घटनास्थळी धाव घेवून व गगनबावडाचे पोलीस निरीक्षक भांडवलकर, वाहतूक पोलीस संजय पवार आदींनी प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. वैभववाडी पोलीसांना माहिती मिळताच वैभववाडी पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. बसमधील उर्वरित प्रवाशांना दुसऱ्या बसने गोव्याकडे मार्गस्थ करण्यात आले. या घटनेची नोंद गगनबावडा पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे.