हनोई: बड्या विमान कंपनीत एअर होस्टेस म्हणून कार्यरत असणारी महिला सेक्स रॅकेटची प्रमुख निघाली. पोलिसांनी एअर हॉस्टेसला अटक केली आहे. ती प्रत्येक ग्राहकाकडून जवळपास अडीच लाख रुपये आकारायची. या प्रकरणात पोलिसांनी तीन फ्लाईट अटेंडेंटला वेगवेगळ्या पुरुषांसोबत अटक केली. या प्रकरणात आणखी एका महिलेलाही अटक करण्यात आली आहे. ती पेशानं मॉडेल आहे. घटना व्हिएतनाममध्ये घडली आहे.रॅकेटची प्रमुख २६ वर्षांची असून तिचं नाव माई हान आहे. तिला पोलिसांनी अटक केली आहे. ग्राहकांना गळाला लावण्यासाठी त्यांना फ्लाईट अटेडंट्सचे हवाई कंपनीच्या गणवेशातील फोटो पाठवले जायचे. या सेक्स रॅकेटमध्ये ३० फ्लाईट अटेंडंट्सचा समावेश आहे. देहविक्रय व्यवसाय चालवण्यासाठी महिलेनं शहरातील रिएंग स्ट्रिट या उच्चभ्रू परिसरातील इमारतीत एक फ्लॅट भाड्यानं घेतला होता. माई हान व्हिएतनाम एअरलाईन्समध्ये एअर होस्टेस होती. पोलिसांनी तिचे एअर हॉस्टेसच्या गणवेशातील फोटो सापडले आहेत. हो ची मिन्ह शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्टला रिएंट स्ट्रिटवर असलेल्या हॉटेलवर छापे टाकण्यात आले. चार खोल्यांमध्ये वेश्या व्यवसाय सुरू होता. तीन फ्लाईट अटेंडंट आणि एक मॉडेल वेश्या व्यवसाय करत होत्या. त्या सगळ्यांचं वय २० वर्षांच्या आसपास होतं. पोलिसांनी चारही महिलांची चौकशी केली. माई हाननं आपल्याला या व्यवसायात आणल्याचं त्यांनी सांगितलं. अनेक फ्लाईड अटेंडंट आणि मॉडेल्सशी संपर्क साधल्याची कबुली माई हाननं दिली. आपण व्हिएतनाम एअरलाईन्समध्ये केबिन क्रू असल्याची माहिती मुख्य आरोपी असलेल्या हाननं पोलिसांना दिली आहे. तिनं सोशल मीडियावर लक्झरी लाईफस्टाईलमधील अनेक फोटो पोस्ट केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here