म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : शहरातील महाआरोग्य शिबिरात सर्व प्रकारचे डॉक्टर उपलब्ध झाले आहेच; शिवाय मानसोपचारतज्ज्ञही उपलब्ध झाले आहेत. खरे म्हणजे टीव्ही किंवा इतर माध्यमातून महाराष्ट्रात विचारांचे प्रदूषण करणाऱ्यांवरही या ठिकाणी उपचार होण्याची गरज आहे आणि जर ‘ते’ मानसोपचार करण्याच्या पलिकडे गेले असतील तर त्यांना पागलखान्यात टाकले पाहिजे, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनानिमित्त विरोधकांवर निशाणा साधला.
Sambhajinagar News: महापालिकेच्या या १२ शाळांना लागणार ताळे; पटसंख्येत घट झाल्याने हालचाली
शहरात रविवारी (१३) आयोध्या मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार संजय शिरसाठ, आमदार नारायण कुचे, विजया रहाटकर, आयोजक राजेंद्र साबळे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
जन्मतारखांच्या घोळामुळे पेन्शन मिळेना; पीएफ कार्यालयात चकरा मारण्याची सेवानिवृत्तांवर वेळ
शिबिराच्या निमित्ताने जिल्ह्यातील साडेतीन लाख व्यक्तींचे स्क्रिनिंग होणे हाही एक उच्चांक आहे. महाआरोग्य शिबिरांना कोविडचा तसेच सरकार बदलल्याचा फटका बसला. मात्र, आता पुन्हा ही शिबिरे सुरू झाली आहेत आणि शेवटच्या माणसापर्यंत शिबिरांचा लाभ पोचवण्यात येत आहे, असेही फडणवीस म्हणाले.

चिमुकल्यांच्या जीवाशी क्रूर खेळ; सापांचा धोका, तरी १२ महिने शाळेसाठी सडक्या थर्माकोलवरून प्रवास

छत्रपती संभाजीनगर: शहरातील महाआरोग्य शिबिरात सर्व प्रकारचे डॉक्टर उपलब्ध झाले आहेच; शिवाय मानसोपचारतज्ज्ञही उपलब्ध झाले आहेत. खरे म्हणजे टीव्ही किंवा इतर माध्यमातून महाराष्ट्रात विचारांचे प्रदूषण करणाऱ्यांवरही या ठिकाणी उपचार होण्याची गरज आहे आणि जर ‘ते’ मानसोपचार करण्याच्या पलीकडे गेले असतील तर त्यांना पागलखान्यात टाकले पाहिजे, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनानिमित्त विरोधकांवर निषाणा साधला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here