लॉडरहिल, फ्लोरिडा: वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाचा पाचवा आणि निर्णायक टी-२० सामना आज रविवारी १३ ऑगस्ट रोजी खेळवला जात आहे. या मालिकेत भारत आणि वेस्ट इंडिजचा संघ २-२ असा बरोबरीत आहे. त्यामुळे हा पाचवा सामना जिंकणारा संघ ही मालिकाही जिंकणार आहे. कसोटी, एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर आता भारतीय संघाला वेस्ट इंडिज दौऱ्यावरील शेवटचे मिशन पार करायचे आहे. या सामन्यासाठी हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वाखालील संघ जाहीर झाला आहे. पाहूया या सामन्यात कोणाला संधी मिळाली आहे; जाणून घ्या भारत आणि वेस्ट इंडिजमधील निर्णायक सामन्याची नाणेफेक झाली असून भारतीय संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पांड्याने संघात कोणताही बदल केला नसून चौथ्या टी-२० साठी जो संघ खेळवला तोच भारताचा संघ या सामन्यात उतरणार आहे. तर वेस्ट इंडिजच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. मॅकॉयच्या जागी अलझारी जोसेफ पुन्हा संघात परतला आहे.
भारतीय संघ
यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार
वेस्ट इंडिजचा संघ
ब्रँडन किंग, काइल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (विकेटकिपर), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ