बारामती: राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर प्रथमच ज्येष्ठ नेते शरद पवार बारामती दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात गुप्त बैठक झाली होती. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आणखी एक राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच बारामतीत येत आहेत. पक्षफुटीनंतर ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाण्याच्या रुग्णालयातील घटनेवर एकनाथ शिंदेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले- अहवालानुसार कारवाई होणार
शरद पवार हे बारामतीत आज दाखल होणार आहेत. त्यांना भेटण्यासाठी मराठा स्वराज्य संघ या संघटनेचे जवळपास १०० हून अधिक कार्यकर्ते उद्या त्यांना भेटून पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल होणार आहेत. मराठा स्वराज्य संघ या संघटनेने आतापर्यंत मराठा जनजागृती करण्याचे काम केले आहे. आंदोलने, निदर्शने, मोर्चे केले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अनेकदा आंदोलने केले आहेत. तसेच दिल्लीमध्ये महाराष्ट्राचं वर्चस्व आहे. ते पवार साहेबांमुळेच आहे. आमचा शरद पवारांना पाठिंबा असल्याचे या संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

फोडाफोडीच्या राजकारणाचे परिणाम भोगावे लागतील, शरद पवारांची भाजपवर टीका

संघटनेतील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे विभागातील पदाधिकारी उद्या शरद पवारांच्या भेटीसाठी येणार आहेत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी मटाशी बोलताना दिली. आमचं वैयक्तिक कोणतेही काम नाही. आम्ही राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांना पाठिंबा देण्यासाठी बारामतीत येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. पवार साहेबांमुळे पुन्हा पक्ष स्वतःच्या हिमतीवर उभा केला जाऊ शकतो. काहीजण वयाचा दाखला देऊन तुम्ही रिटायर व्हा, असे म्हणतात. मात्र ही भूमिका चुकीचे असल्याचे या संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here