अर्जुन राठोड, नांदेड:अधिकमासनिमित्त शहरातील अनेक मंदिरात धार्मिक कार्यक्रमासह विविध उपक्रम राबवले जातं आहेत. तीर्थक्षेत्र असलेल्या माहूर गडावरील आनंद दत्तधाम आश्रमात देखील अनोखा उपक्रम राबवला जातं असून माहूरवासियांना महिनाभर धोंड्याचे चूल बंद जेवण दिलं जातं आहे. या माध्यमातून आनंद दत्तधाम आश्रमाने धार्मिक सलोखा जपला आहे.

अधिकमास हा हिंदू धर्माचा पवित्र सण मानण्यात येतो. याच महिण्याला पुरुषोत्तम महिना अर्थात धोंड्याचा महिना म्हणून ओळखले जाते. धोंड्याच्या महिण्यात अन्नदानाला महत्व दिलं जातं . अधिकमास तीन वर्षातून एकदा येतो. याच अनुषंगाने आनंद दत्तधाम आश्रमात अधिक मास निमित्त भाविकांना धोंड्याचे जेवण दिलं जातं आहे . मागील ३० वर्षांपासून आश्रमाने परंपरा कायम ठेवली आहे. दरम्यान, माहूरच्या देवीच्या दर्शनासाठी आलेल्या मराठवाडा आणि विदर्भातील भाविक तसेच माहूर शहरातील नागरिक असं दररोज दहा हजाराच्या संख्येने धोंड्याच्या जेवणाचा आस्वाद घेत आहेत. कलयुगात अन्नमय प्राण म्हणजे आहारा शिवाय जीवन, अन्नदान आणि नामस्मरण हे जिवाच्या उद्धाराचे साधन आहे म्हणून या पवित्र महिनाभर धोंड्याचे जेवण देण्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आनंद दत्तधाम आश्रम माहुर गडाचे मठाधिपती राष्ट्रसंत साईनाथ महाराज बितनाळकर दिली.

कमला एकादशी निमित्त संतनगरीत भक्तांची मांदियाळी, ५-६ तास रांगेत उभं राहून भाविकांनी घेतलं श्रींचं दर्शन

महाप्रसादासाठी वाघा बोर्डरच्या लष्करी जवानांचा पुढाकार:

आनंद दत्तधाम आश्रमात वर्षभर उपक्रम सुरु असतात. अधिकमास निमित्त आश्रमाच्यावतीने महिनाभर धोंड्याचे जेवण दिलं जातं आहे. याच सामाजिक कार्याला हातभार लावण्यासाठी वाघा बॉर्डरच्या लष्करी जवानांनी पुढाकार घेतला आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जवानांनी देखील महाप्रसादाचे आयोजन केलं आहे. १५ ऑगस्ट रोजी जवानांकडून भाविकांना धोंड्याचे जेवण दिले जाणार आहे. लष्करी जवानांनी राबवलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जातं आहे.

अधिक मासात सासुरवाडीला निघालेल्या जावईबापूंवर काळाचा घाला, पत्नीच्या डोळ्यांदेखत मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here