मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये गेल्या वर्षभरापासून विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे जोरदार ‘इनकमिंग’ सुरू असताना पहिल्यांदाच शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची मोठी यादी समोर आली आहे. स्वत:ला कडवे शिवसैनिक म्हणवून घेणारे रामदास कदम यांचे सुपुत्र सिद्धेश कदम यांच्यामुळे पदाधिकाऱ्यांनी राजीनास्त्र उपसल्याची घटना ताजी असतानाच जोगेश्वरीतील शिंदे गटात असंतोष उफाळून आला आहे. शिंदे गटाचे जोगेश्वरी पूर्ण येथील विभाग क्रमांक चारचे प्रमुख विजय धिवार आणि महिला विभागप्रमुख शिल्पा वेले यांच्या छळामुळे आम्हाला आत्महत्या करावी वाटतीये, अशा उद्विग्न भावना शाखा संघटकांनी बोलून दाखवल्या आहेत.

शिवसेनेत फूट पडून आता जवळपास वर्ष होत आले असून, या कालावधीत उद्धव ठाकरे यांच्या गटातील अनेक नगरसेवक व पदाधिकारी शिंदे यांच्या गटात येत आहेत. असे असताना त्यांच्याच पक्षातील कांदिवली, चारकोप, मालाडमधील पदाधिकाऱ्यांनी पत्र पाठवून राजीनामा देण्याचा इशारा दिला. त्यानंतर जोगेश्वरीमधला शिवसेना शिंदे गटातील संघर्ष उफाळून आला आहे.

पुरुष पहाटे शपथ घेणार, बायकांनी सडे घालून रांगोळ्याच काढायच्या का? तरुणीचा पवारांना तिखट सवाल
शाखाप्रमुख असलेले प्रकाश शिंदे म्हणाले, विभागप्रमुख विजय धिवार यांची मनमानी आम्ही सहन केली. आमच्या तक्रारी आम्ही वरिष्ठ नेते संजय मोरे, सिद्धेश कदम आणि नरेश म्हस्के यांच्या कानावर घातल्या. पण तरीही विजय धिवार यांची मनमानी सुरूच आहे. त्यामुळे शाखा क्रमांक ७७ मधील जवळपास २०० पदाधिकारी तर जोगेश्वरीतील जवळपास ४०० पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत आहेत.

एकनाथ शिंदे यांना झटका, वारं फिरलं, आतापर्यंत इनकमिंग होतं, आता आऊटगोईंगला सुरूवात!
विभागप्रमुख विजय धिवार यांना पक्षाची कोणतीही चिंता नाही. ते महिलांचा मानसिक छळ करतात. आम्हाला दडपण आलंय. जीव द्यावासा वाटतोय. विभागप्रमुख महिलांशी बोलताना इतक्या घाणेरड्या शब्दांत बोलतायेत की आम्ही शब्दात सांगू शकत नाही. त्यांच्या कामाला कंटाळून आम्ही प्रभागातील महिला राजीनामा देणार आहोत, अशा संतापजनक भावना जोगेश्वरी विधानसभेच्या संघटक सुरेखा सुर्वे यांनी व्यक्त केल्या.

ती डेडलाइन हुकली, अजित पवार-शरद पवार भेटीवर पृथ्वीराज चव्हाण यांना वेगळीच शंका
रामदार भाईंचे सुपुत्र देतायेत, कंटाळून राजीनामा देत आहोत

‘आमच्या विधानसभा क्षेत्रात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सिद्धेश कदम यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मानसिक त्रास देत छळ करायला सुरुवात केली आहे. त्याला कंटाळून आम्ही राजीनामा देत आहोत’, अशी प्रतिक्रिया कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्राचे शिवसेना विभागप्रमुख विकास गुप्ता यांनी दिली. तर ‘मालाडमध्ये सुरुवातीपासून काम करतोय. मात्र आता काहीही कारण नसताना लोकांना पदावरून काढण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे पदाधिकारी चिंताग्रस्त आहेत.. आम्ही एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पदाचा राजीनामा देणार आहोत’, असे मालाडचे विधानसभा संघटक नागेश आपटे म्हणाले.

कोरोना काळात आरोग्यमंत्री नव्हते हेच समाधान; रोहित पवारांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here