जवळच्या अंतरामुळे मुंबईकर विशेषतः वीकेंडला अलिबागला जाणं पसंत करतात. अलिबाग परिसरात अनेक दिग्गजांचे फार्म हाऊस, सेकंड होम आहेत. निसर्गाची देणगी लाभलेल्या या परिसराची मोहिनी सगळ्यांनाच पडते. याच अलिबाग तालुक्यात विराट कोहली व अनुष्का शर्मा यांचे फार्म हाऊस उभारण्याचं काम सुरू आहे.
आपल्या या ड्रीम प्रोजेक्टची पाहणी करण्यासाठी अनुष्का व विराट हे रविवारी १३ ऑगस्ट रोजी अलिबाग दौऱ्यावरती आले होते. अलिबाग तालुक्यात झिराडजवळ आवास येथे हे फार्म हाऊस आहे. तब्बल वीस हजार चौरस मीटर अंतरावर पसरलेलं हे भव्य आलिशान फार्म हाऊस उभे राहत आहे.
अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी हे फार्म हाऊस उभे राहत आहे. विस्तरणाच्या आठ एकर जागेवर अनुष्का व विराट यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आकार घेत आहे.
समीरा हॅबिटॅट्सने ही जागा दाखवल्यानंतर ही निसर्गदत्त जागा या दोघांनाही आवडली. यानंतर या जागेची खरेदी करून हे फार्म हाऊस उभारण्याचं काम सध्या सुरू आहे. या फार्म हाऊसचे डिझाइन विख्यात वास्तुविशारद मुझुमदार ब्राव्हो यांनी केल्याची माहिती सुत्रांकडून मिळते. त्यामुळे हे फार्महाऊस अतिशय अलिशान, लक्झरीयस असेच काहीसे खास असणार आहे. विराट कोहली व अनुष्का शर्मा या सगळ्या बांधकामाची पाहणी करण्याकरता रविवारी १३ ऑगस्ट रोजी अलिबाग येथे आले होते.