मुंबई: प्रकरणात नाव आलेला बॉलिवूडमधील चित्रपट निर्माता यांच्या सखोल चौकशीची मागणी काँग्रेसनं केली आहे. ही मागणी सीबीआयपर्यंत पोहोचवणार, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली.

सुशांतसिंह प्रकरणात संदीप सिंह याचं नाव अचानक चर्चेत आलं आहे. सुशांतचा जवळचा मित्र असलेल्या संदीपचे बॉलिवूडमधील ड्रग रॅकेटशी संबंध असल्याचंही बोललं जातं. याच संदीप सिंहने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट बनवला होता. तो मॉरिशसमध्ये एका लैंगिक अत्याचार प्रकरणात अडकल्याचा आरोपही काँग्रेसनं केला आहे. याच संदीप सिंहनं महाराष्ट्र भाजपच्या कार्यालयात मागील ५३ वेळा कॉल केले होते. तो नेमका कोणाशी बोलायचा? भाजपमधील त्यांचा हँडलर कोण आहे? असे प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यापूर्वीच उपस्थित केले आहेत. मात्र, आता त्याचा पाठपुरावा करण्याचा निर्धार काँग्रेसनं केल्याचं दिसत आहे.

वाचा:

सचिन सावंत यांच्यासह काँग्रेसच्या शिष्टमंडळानं या संदर्भात आज गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. भाजप आणि संदीप सिंह, संदीप सिंह आणि ड्रग्ज या सगळ्यामध्ये किती आणि कसे कनेक्शन आहे, याची चौकशी व्हायला हवी, अशी विनंती शिष्टमंडळाने गृहमंत्र्यांकडे केली. काँग्रेसच्या शिष्टमंडळाची ही मागणी आपण सुशांत प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआयच्या टीमपर्यंत पोहोचवू, असं आश्वासन देशमुख यांनी दिलं.

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात रोज नवनवे खुलासे येत असल्यामुळं यातील गुंतागुंत वाढली आहे. मोदी चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या संदीप सिंहचं नाव या प्रकरणात आल्यानं काँग्रेस आक्रमक झाली आहे.

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here