वाचा:
करोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनला विशिष्ट कालावधीनंतर प्रकाश आंबेडकरांनी विरोध सुरू केला होता. लोकांनी बिनधास्त नातेवाईकांना भेटावे. नेहमीप्रमाणे कामे करावीत, असं आवाहनही त्यांनी केलं होतं. मोबाइलवर सतत वाजणाऱ्या करोनाच्या कॉलर ट्यूनलाही विरोध करत त्यामागे काहीतरी षडयंत्र असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. त्याच भूमिकेच्या अनुषंगानं त्यांनी राज्यातील मंदिरं उघडण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज येथे आंदोलन होणार होते. मात्र, त्याआधीच प्रकाश आंबेडकर यांच्यासह १५ जणांना नियम पाळून मुखदर्शनाची परवानगी देण्यात आली. त्यामुळं प्रकाश आंबेडकरांनी आंदोलन मागे घेतले.
वाचा:
आंबेडकरांनी त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ‘वंचित’नं मंदिरांच्या प्रश्नावर घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे साहजिकच त्यांना हिंदुत्वाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या अनपेक्षित प्रश्नावर आंबेडकरही काही सेकंद थांबले. मात्र, त्यानंतर त्यांनी आपली भूमिका मांडली. ‘महात्मा फुले, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही गुरू मानतो. या तिघांनीही कधी धर्म नाकारला नाही. धर्म अविभाज्य अंग आहे, असं त्यांचं मत होतं. आम्ही त्यांच्या विचारानं चालतो. कोणी कोणाला मानायचं याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. इतर कोणी ते लादू शकत नाही किंवा लादू नये,’ असं ते म्हणाले. ‘वारकऱ्यांना विठुरायाचं दर्शन घ्यायचं आहे. मात्र नियमांमुळं त्यांची अडचण होतेय. हे लक्षात घेऊन आम्ही आंदोलन केलं,’ असं त्यांनी सांगितलं.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times