मुंबईः महाराष्ट्रात अनलॉक-४संदर्भात नियमावली जाहीर केली आहे. राज्य सरकारच्या या नियमावलीनुसार आता जिल्हांतर्गंत प्रवास करताना ई-पासची अट्ट हद्दपार करण्यात आली आहे. आता ई-पासशिवाय राज्यात प्रवास करता येणार आहे. केंद्रानं परवानगी दिल्यानंतरही राज्यात ई-पासची अट कायम ठेवण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या टीकेनंतर अखेर राज्य सरकारनं ई-पास संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. १ सप्टेंबरपासून अनलॉक-४चा टप्पा सुरू होत आहे.

याशिवायचं खासगी आणि मिनी बसेसना परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल आणि लॉज यांनाही पूर्णपणे सुरू होण्यास परवानगी देण्यात आल्यानं हॉटेल व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. तसंच, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दररोज २०० उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे. उद्यापासून १०० विमाने जाणार व १०० येणार. यापूर्वी आतापर्यंत करोना संकटामुळे हा आकडा ५०-५० असा होता. मुंबई आणि एमएमआरमध्ये शासकिय कार्यालय ३० टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. तर, उर्वरित महाराष्ट्रात सरकारी कार्यालयात ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती काम सुरू करता येणार आहे. मात्र, सोशल डिस्टनसिंग आणि मास्क वापरणं बंधनकारक आहे.

हॉटेल आणि लॉज १०० टक्के सुरु होणार असले तरी, मेट्रो आणि सिनेमागृह अद्याप बंदच राहणार आहेत. त्याचबरोबर, शाळा आणि महाविद्यालये ३० सप्टेंबरपर्यंत सुरु करता येणार नाहीत. स्विमिंग पूल, एंटरटेन्मेंट पार्क, बार सभागृह, जिम यांच्यावरील निर्बंध कायम आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये आधीच्याच नियमांनुसार व्यवहार सुरु राहतील.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here