सिंधुदुर्ग: कणकवली तालुक्यातील जाणवली ओव्हरब्रिजवर रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलस्वाराचा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की दुचाकीस्वार जागीच ठार झाला. कणकवली तालुक्यातील वागदे येथील गणेश उदय काणेकर (१७ रा. वागदे सावरवाडी, गोपुरी ) असे त्याचे नाव आहे. अपघाताची घटना घडल्यावर माहिती मिळताच कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र अपघातात त्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच गतप्राण झाल्याचे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच; दोन ट्रकची धडक, स्टेअरिंग आणि सीटमध्ये ड्रायव्हर अडकला
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश याच्या डोक्याला पाठीमागे जखमा होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्याच्या कानातून रक्त वाहत होते. तसेच हातापायाला किरकोळ जखमा झाल्या होत्या. अशा अवस्थेत असताना त्याचा मृत्यू झाला आहे. हा मोटरसायकलस्वार स्पोर्टबाईक घेऊन जाणवली येथून वागदे या दिशेने भरधाव वेगाने जात होता. परंतु त्याची दुचाकी रस्त्यावर घसरून अपघात झाला आहे. यात त्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.

चालकाचं नियंत्रण सुटलं, जालना-पुसद बस कोसळली; २२ प्रवासी जखमी

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच कणकवली तालुक्यासह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली. गणेश हा जाणवलीहून वागदेच्या दिशेने जात असताना त्याचा अपघात झाल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या नागरिकांकडून सांगण्यात आली. गणेश याच्या पाश्चात आई, वडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनायक चव्हाण, देसाई यांनी घटनास्थळासह उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. यावेळी मिलिंद मेस्त्री, आण्णा कोदे, ऍड. सुहास साटम, बबली राणे यांच्यासह अनेकांनी धाव घेतली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here