सिंधुदुर्ग : कोकणात मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो आणि दरवर्षी लाडक्या बाप्पाची आतुरतेने वाट पाहिली जाते. गणेशोत्सवाला चाकरमानी मोठ्या संख्येने आणि भक्तीभावाने गावी येतात. काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे सुस्थितीत व्हावा आणि गावी येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री यांनी यांची भेट घेतली आहे.संपूर्ण कोकणपट्ट्यात उत्साहाने व आनंदाने साजरा केला जाणारा गणेशोत्सव जवळ येऊन ठेपला आहे. मुंबई व परिसरात नोकरी-व्यवसाय करणारे लाखो चाकरमानी कोणत्याही अडचणी न जुमानता गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणातील आपल्या गावांकडे धाव घेतात व त्यासाठी मुख्यतः मुंबई-गोवा महामार्गाचा (एन्. एच्. ६६ ) वापर करतात. मुंबई-गोवा महामार्गाची सद्यस्थिती अतिशय दयनीय आहे. कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये या महामार्गावर खड्डयांचे जाळे पसरले असून महामार्गाची चाळण झाली आहे. महामार्गाच्या या स्थितीमुळे राज्यभरातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार असून अपघातही होऊ शकतात. म्हणून मुख्यमंत्र्यांचे लक्ष नारायण राणे यांनी वेदले आहे. परिस्थिती लक्षात घेता गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या व नंतर परतणा-या प्रवाश्यांचा प्रवास विना अडथळा व सुरक्षिततेने पार पडावा या दृष्टीने गणेशोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वी तातडीने मुंबई-गोवा महामार्गाची ( एन्. एच्. ६६ ) दुरुस्ती व सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावे अशी विनंती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे.
Home Maharashtra केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; काय झाली भेटीत महत्त्वाची...