मुंबईः आज राज्यात तब्बल ११ हजार १५८ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर, एकाच वेळी ११ हजार ८५२ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळं राज्यातील करोनास्थितीत अद्यापही चिंता वाढवणारी आहे. ()

राज्यात एकीकडे करोना रुग्ण बरे होण्याची स्थिती समाधानकारक असली तरी दर दिवसाला वाढणाऱ्या रुग्णांची संख्यांही अधिक आहे. आज तब्बल ११, ८५२ नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळं राज्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या ७ लाख ९२ हजार ५४१ इतकी झाली आहे. त्यामुळं राज्यातील रुग्णसंख्या ८ लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४१ लाख ३८ लाख ९२९ चाचण्यांपैकी ७ लाख ९२ हजार ५४१ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर बाकीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

राज्यात सध्या ११ हजार १५८ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं राज्यात आजपर्यंत एकूण ५ लाख ७३ हजार ५५९ करोना बाधित रुग्णांनी करोनाची लढाई जिंकली आहे. त्यामुळं राज्यातील रिकव्हरी रेट ७२. ३७ टक्के इतका झाला आहे.

राज्यात आज १८४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळं राज्यातील एकूण करोनाबाधित मृतांचा आकडा २४ हजार ५८३ इतका झाला आहे. त्यामुळं राज्यातील मृत्यूदर ३.१ टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात १३ लाख ५५ हजार ३३० व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर, ३५ हजार ७२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. तर राज्यातील विविध रुग्णालयांत एकूण १ लाख ९४ हजार ०५६ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here