नवी दिल्लीः भारतरत्न आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे दीर्घ आजाराने सोमवारी निधन झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

माजी राष्ट्रपती प्रणव यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार केले जाण्याची शक्यता आहे. पण अंत्यसंस्काराची वेळ अद्याप निश्चित झालेली नाही. पश्चिम बंगालमधील मूळ गावाऐवजी राजधानी दिल्लीतच मुखर्जी यांच्यावर अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आज दिल्लीत निधन झाले. प्रणवदांवर आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. ते ८४ वर्षांचे होते. प्रणव मुखर्जी हे देशाचे १३वे राष्ट्रपती होते. बऱ्याच काळपासून ते आजारी होते. त्यांचा करोना चाचणी रिपोर्टही पॉझिटिव्ह आला होता.

मुखर्जींच्या निधनावर मान्यवरांकडून शोक व्यक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशभरातील अनेक नेत्यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनी प्रणव मुखर्जी यांच्यासमवेत त्यांची छायाचित्रे ट्विट केली आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी दिलेला सल्ला संस्मरणीय असल्याचे वर्णन पंतप्रधान मोदींनी केलंय.

पंतप्रधानांनी एकापाठोपाठ एक अनेक ट्विट केले. भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर संपूर्ण देश शोकाकुल आहे. मुखर्जींनी आपल्या देशाच्या विकासावर आपली छाप सोडली आहे. ते एक विद्वान आणि उत्तम राजकारणी होते. समाजातील सर्व घटक आणि राजकीय वर्गात त्यांचा मान होता, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांसह अनेक प्रमुख नेत्यांनी मुखर्जींच्या निधनावर शोक व्यक्त केला. तसंच भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाकडून मुखर्जींच्या निधनावर शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहण्यात आली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here