२४ टक्यांनी घसरला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ही सर्वात मोठी घसरण आहे. प्रत्येक इशाऱ्याकडे सरकारने दुर्लक्ष करणं हे अतिशय दुर्दैवी आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. राहुल गांधी यासंदर्भात ट्विट केलंय. या ट्विटमध्ये राहुल गांधींनी स्वत: चा एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओत राहुल गांधी हे अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावर सरकारला सल्ला देताना दिसत आहेत.
सांख्यिकी मंत्रालयाने सोमवारी २०२०-२१ आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी जाहीर केली. आकडेवारीनुसार या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत २३.९ टक्के इतकी ऐतिहासिक घसरण नोंदवली गेली आहे. जुलैमध्ये आठ उद्योग क्षेत्रांचे उत्पादन ९.६ टक्क्यांनी घटले आहे.
पहिल्या तिमाहीत स्थिर किमतींवर वास्तविक जीडीपी २६.९० लाख कोटी रुपये होती. जी गेल्या वर्षी याच काळात ३५.३५ लाख कोटी रुपये होती. अशा प्रकारे यात २३.९ टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या वर्षी या काळात जीडीपीमध्ये ५.२ टक्के वाढ झाली होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times