म. टा. प्रतिनिधी, : पुणे शहर व जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बाधितांची संख्या वाढल्याने चिंता वाढली होती. मात्र, सोमवारी शहरासह जिल्ह्यातील चाचण्यांची संख्या कमी झाल्याने १९३३ जणांना लागण झाली. तर शहर व जिल्ह्यात ७३ जणांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या अशीच घटत राहिल्यास पुणेकरांना दिलासा देणारी बाब ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

पुणे शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही सोमवारी रुग्णसंख्या घटल्याचे चित्र दिसून आले. शहर जिल्ह्यात १९३३ जणांना लागण झाली असली तरी बाधितांची संख्या १ लाख ७० हजार ३१४ पर्यंत पोहोचली. तर जिल्ह्यात एकूण बरे झालेल्यांची संख्या १ लाख ३२ हजार ६०१ एवढी झाली आहे. याचाच अर्थ बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

दरम्यान, आज राज्यात तब्बल ११ हजार १५८ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर, एकाच वेळी ११ हजार ८५२ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळं राज्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या ७ लाख ९२ हजार ५४१ इतकी झाली आहे. राज्यात सध्या ११ हजार १५८ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं राज्यात आजपर्यंत एकूण ५ लाख ७३ हजार ५५९ करोना बाधित रुग्णांनी करोनाची लढाई जिंकली आहे. आज तब्बल १८४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळं राज्यातील एकूण करोनाबाधित मृतांचा आकडा २४ हजार ५८३ इतका झाला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here