मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला (सीएसएमटी) लागूनच असलेला नव्याने बांधलेल्या हिमालय पुलाला आता सरकता जिना बसवण्यात येणार आहे. त्यासाठीची किरकोळ कामे सुरू झाली आहेत. दीड महिन्यात हा जिना बसवून सेवेत येईल, अशी माहिती महापालिकेच्या पूल विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मार्च २०१९मध्ये हिमालय पूल कोसळून झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला होता. तर काही प्रवासी जखमीही झाले होते. त्यानंतर चार वर्षे पूल पुनर्बांधणीसाठी बंदच होता. निविदा प्रक्रियेसाठी लागलेला विलंब, मार्च २०२०पासून करोनाचा संसर्ग आणि अन्य तांत्रिक कामांमुळे पुलाचे काम रखडले होते. मात्र या कामाला गती देत पुलाची पुनर्बांधणी करण्यात आली. पूल बांधण्यासाठी पोलादाचा वापर करण्यात आला आहे. ३५ मीटर लांब आणि सहा मीटर रुंद हा पूल आहे.

कोर्टाने महापालिकेला लावलं कामाला, आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश, सुट्ट्याही रद्द केल्या
हिमालय पुलाला सरकते जिने बसवण्यात येणार आहेत. तुर्तास प्रवाशांना एका जिन्याचा वापर करता येत आहे. त्यामुळे एका जिन्यावरूनच पादचारी पुलावर पादचाऱ्यांना जाता येत आहे. मात्र हा जिना अरूंद असून सकाळी-संध्याकाळी तसेच पावसात त्याचा वापर करताना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. हिमालय पुलाला सरकता जिना बसवण्यासाठी कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे वृद्ध, गरोदर स्त्रियांना दिलासा मिळेल. साधारण दीड महिन्यात काम करून सरकता जिना सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.

सुविधांचा अभाव कायम

हिमालय पूल सुरू होताच त्याचा पादचाऱ्यांना काही प्रमाणात फायदा होत असला तरीही त्यावर सुविधांचा अभावही आहे. पुलावर अद्यापही छप्पर बसवण्यात आले नसल्याने ऊन आणि पावसात जाता-येता त्रास सहन करावा लागतो. सध्या जिन्याच्या दिशेने दोन दिव्यांची सोय करण्यात आली आहे, मात्र हे दिवे कधी बंद तर कधी सुरू असतात. त्यामुळे पुलावर आणि जिन्यावरून प्रवास करताना काहीवेळा अंधाराचा सामना करावा लागतो. याकडे महापालिकेचे दुर्लक्षच झाले आहे.

Mumbai Local: मुंबईकरांची गर्दीतून सुटका होणार, पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या ‘इतक्या’ लोकल फेऱ्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here