मुंबईः मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटसमोर एका भरधाव कारनं आठ जणांना उडवल्याची घटना घडली आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जे.जे रुग्णलयात उपचार सुरू आहेत.

मुंबईतील क्रॉफड मार्केट परिसरात आठ जणांना उडवणाऱ्या या कारनं जनता कॅफे या हॉटेलला धडक दिली. अपघातानंतर जखमींना तातडीने जे. जे रुग्णालयात दाखल केले आहे. तसंच, गाडीतील व्यक्तीलाही रुग्णालयात दाखल केले आहे. हॉटेलला धडक दिल्यानं कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे.

फुटपाथवर उभा असलेल्या मोहम्मद हानिफ हा तरुणही गंभीर जखमी झाला आहे, मोहम्मह हा जवळच्याच एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम पाहतो. तसंच, नदीम अदील अन्सारी हे फुटपाथवर हेअर क्लिप विकून आपला संसाराचा गाडा चालवतात. त्यांना तीन मुलं असून ते ही या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. अशी माहिती नदीम यांचे नातेवाईकांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here