त्यांच्यासाठी ट्विटरवरून कमाईचा काही भाग त्यांच्या वापरकर्त्यांना देण्याची घोषणा करण्यात आली होती. आता त्यांना जाहिरात महसूल सामायिकरण योजनेअंतर्गत मिळालेल्या खातेदारांच्या उत्पन्नावरही कर भरावा लागणार आहे.
GST कक्षेत ट्विटर (X) कमाई
पीटीआयच्या एका अहवालात तज्ञांचा हवाला देत असे सांगण्यात आले आहे की जर एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न २० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्याला १८% जीएसटी भरावा लागेल. तज्ञांनी सांगितले की X मधून मिळणारे उत्पन्न जीएसटी कायद्याखाली आणले जाईल आणि ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न भाडे, बँक एफडी आणि इतर व्यावसायिक सेवांवरील व्याज २० लाखांपेक्षा जास्त असेल त्यांना १८% वस्तू आणि सेवा कर भरावा लागेल.
लक्षात घ्या की एलन मस्कने गेल्या महिन्यात जाहिरातींचा महसूल वाटप कार्यक्रम सुरू केला. या अंतर्गत कंपनी जाहिरातीतून मिळणाऱ्या कमाईचा काही भाग लोकप्रिय निर्मात्यांसह शेअर करते. X मधून पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला काही अटी पूर्ण कराव्या लागतील.
या अटी पूर्ण केल्यावर सुरू होईल तुमची कमाई
X मधून पैसे मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुमचे खाते सत्यापित केले पाहिजे. म्हणजे तुम्ही X प्रीमियमचे सदस्यत्व घेतले असले पाहिजे. यानंतर तुमच्या खात्यावर गेल्या तीन महिन्यांत पाच दशलक्षाहून अधिक ट्विट इंप्रेशन असावेत (केवळ सत्यापित खाती मोजली जातील). तसेच, खात्यात ५०० सक्रिय फॉलोअर्स असावेत.
या तीन अटी पूर्ण केल्यानंतर तुम्ही X वरूनही कमाई करू शकता. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी अलीकडेच X कडून महसूल वाटा मिळवण्याबद्दल ट्विट केले. सध्या २० लाख रुपयांच्या वर सेवांमधून महसूल किंवा उत्पन्न मिळवणाऱ्या व्यक्ती आणि संस्था वस्तू आणि सेवा कर (GST) नोंदणीसाठी पात्र असून मिझोरम, मेघालय, मणिपूर यासारख्या काही विशेष श्रेणीतील राज्यांसाठी ही मर्यादा १० लाख रुपये आहे.