नागपूर: अतिवृष्टीमुळे पूर्व विदर्भातील , , चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना मोठा फटका बसला असून जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. बचाव पथकांचे कार्य वेगाने सुरु असून नागरिकांचे जीव वाचविण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. बचावकार्यासाठी सैन्यदलाची मदत घेतली आहे. प्राथमिक अंदाजानुसार विभागातील १४ तालुक्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला असून ९० हजार ८५८ नागरिक पूर बाधित आहेत. त्यापैकी ४७ हजार ९७१ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यंत्रणेला यश आले आहे. विभागात एकूण १३८ पुनर्वसन केंद्रात ९ हजार ९८२ पूर बाधितांना तात्पुरत्या निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे. ( Heavy rain flood situation in Vidarbha )

वाचा:

विभागीय नियंत्रण कक्षात प्राप्त माहितीनुसार सोमवारी तीन वाजेपर्यंत नागपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी, येथे सैन्यदलाच्या मदतीने मदत कार्य करण्यात आले. नागपूर जिल्हयातील ५ तालुक्यांमध्ये ६१ गावे बाधित झाली आहेत. ४९११ कुटुंबांतील २८ हजार १०४ व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. जिल्हयातील मौदा, कामठी, पारशिवणी, कुही, सावनेर या तालुक्यांना फटका बसला आहे. तर भंडारा जिल्ह्यात पवनी, लाखांदूर, भंडारा येथे च्या दोन व भंडारा, मोहाडी, तुमसर येथे एसडीआरएफच्या दोन चमूंनी बचतकार्य केले. चंद्रपूर जिल्ह्यातील लाडज येथे दोन एनडीआरएफ चमू व लाडज व बेलगाव येथे दोन एसडीआरएफच्या चमूंनी मदत कार्य केले.

वाचा:

भंडारा जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर पुराचा तडाखा बसला असून ५५ हजार लोक पूर बाधित झाले आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मदत कार्य सुरु असून ६२ निवारा केंद्रांत १३६९ लोकांना हलविण्यात आले आहे. आतापर्यंत सुमारे १४ हजार ८१३ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात २१ गावांतील ४ हजार ८५९ लोकांना फटका बसला असून ३ हजार १५९ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा, आरमोरी व गडचिरोली तालुक्यातील दहा गावे बाधित असून २ हजार ९८ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. दहा पुनर्वसन केंद्रांत १३७५ लोकांची आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here