नवी दिल्लीः चलाख चीनच्या LAC वर कुरापती सुरूच आहेत. पूर्व लडाख प्रदेशातील पँगॉंग सरोवराजवळ चिनी सैन्याने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय लष्कराच्या जवानांनी हा डाव उधळून लावला.

एलएसीमधील तणावपूर्ण वातावरण पाहता भारतीय सैन्याच्या विकास रेजिमेंट बटालियनला उत्तराखंड येथून पँगॉंग सरोवराच्या दक्षिणेकडील किनाऱ्याजवळ तैनात करण्यात आले आहे. वास्तविक नियंत्रण रेषेवर भारतीय प्रदेशात निष्क्रीय असलेल्या एका मोक्याच्या उंच डोंगरावर बटालियनने ताबा घेतला आहे.

हे क्षेत्र आमच्या भागात असल्याचा दावा चीनने केला आहे. तसंच या उंच डोंगरावर कब्जा करण्याचा चिनी सैन्याचा प्रयत्न होता. या डोंगरावर ताबा करणाऱ्याला पँगाँग सरोवर आणि त्याच्या आजूबाजूच्या दक्षिण किनाऱ्यावर नियंत्रण ठेवता येतं. त्याचा सामरिकदृष्ट्या लाभ होता.

चीन अशी काही कुरापत करणार याचा अंदाज भारतीय लष्कराला होता. यामुळे चिनी सैन्यकडून कुठलही पाउल उचलण्याआधी भारतीय जवानांची तुकडी या मोक्याच्या उंचीवर तैनात करावी, असा निर्णय घेण्यात आला. तर सीमेवरील तर सीमेवरील तणाव दूर करण्यासाठी दोन्ही देशांच्या सैन्यात ब्रिगेड कमांडर स्तरावर चुशूल आणि मोल्डो येथे बैठका घेण्यात आल्या. पण त्या निष्फळ ठरल्या.

थाकुंगजवळील उंच डोंगरांवर लष्कराची लढाऊ वाहनं आणि रणगाड्यांसह शस्त्रे हलवण्यात आली आहेत. या संपूर्ण कारवाईत साहभागी झालेल्या भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांसह विकास रेजिमेंट अंतर्गत काम करणाऱ्या तिबेटी नागरिकांचाही समावेश आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here