लंडन: एका व्यक्तीने जोरदार येणारी शिंक रोखून ठेवल्याने त्याचा घसा जखमी झाला आहे. बीएमजे केस रिपोर्ट्समध्ये प्रकाशित झालेल्या एका पेपरनुसार, एका ३४ वर्षीय व्यक्तीने तोंड बंद करून आणि दोन्ही नाकपुड्या दाबून शिंक रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु शिंकेच्या तीव्रतेने त्याचा घसाच फाटला. ‘स्नॅप, क्रॅकल अँड पॉप: जेव्हा शिंकल्यामुळे मानेमध्ये कर्कश आवाज येतो’ असं शीर्षक असलेल्या पेपरमध्ये असा दावा करण्यात आला आहे की त्या व्यक्तीने ‘नाक बंद करुन, तसेच आपलं तोंड बंद करून शिंक थांबवण्याचा प्रयत्न केला’.

शिंक थांबवण्याच्या घटनेनंतर त्या व्यक्तीच्या मानेवर सूज आली आणि त्याला विचित्र लक्षणं दिसू लागली. ज्यामध्ये अन्न गिळताना वेदना होणे, आवाजात बदल होणे, गळ्यात कर्कश आवाज होणे आणि मानेला सूज येणे यांचा समावेश आहे. यानंतर त्यांनी वैद्यकीय मदत घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्या घशातील काही टिश्यूजमध्ये हवा अडकली होती, त्यामुळे त्यांचा घसा फाटल्याचं डॉक्टरांनी सांगितले. घसा अशा प्रकार फाटणे हे फारच दुर्मिळ आहे, सामान्यत: उलट्या होणे, खाज सुटणे, जोरदार खोकला किंवा एखाद्या प्रकारच्या आघातामुळे असं होतं.

फरशीखालून विचित्र आवाज, तोडून पाहिलं तर तीन भयकंर प्राणी निघाले, VIDEO पाहून धडकी भरेल
घशात कोणत्याही संसर्गाचा धोका किंवा संसर्गाची वाढ टाळण्यासाठी त्या व्यक्तीला वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. रुग्णाला फीडिंग ट्यूब आणि अँटीबायोटिक्स देण्यात आले. दोन आठवड्यांनंतर तो बरा झाला आणि साधं, मऊ अन्न खाऊ लागला. ‘नाक-तोंड बंद करुन शिंक थांबवणे ही एक धोकादायक प्रक्रिया आहे आणि ती टाळली पाहिजे’, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


असं केल्यास काय नुकसान होऊ शकते?

यामुळे स्यूडोमेडिस्टिनम (दोन फुफ्फुसांच्या मध्ये छातीत अडकलेली हवा), टायम्पॅनिक(छिद्रित कानाचे पडदे) आणि सेरेब्रल एन्युरिझम (मेंदूतील फुग्यासारखी रक्तवाहिनी) यांसारखी समस्या उद्भवू शकते.

काॅन्स्टेबलकडून ३ प्रवासी अन् एका पोलीसावर गोळीबार; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये थरकाप उडवणारी घटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here