नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ” या कार्यक्रमाचा व्हिडिओ पक्षाने युट्यूबवर पोस्ट केला. यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणाव ‘डिसलाइक’ केला गेला. ‘डिसलाइक’ करणाऱ्यांमध्ये ९८ टक्के विदेशीतील नागरिक आहेत आणि यामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप भाजपने सोमवारी केला.

यांनी रविवारी ३० ऑगस्ट रोजी ‘ मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला. या कार्यक्रमाचा व्हिडिओ ‘लाइक’ पेक्षा जास्त ‘डिसलाइक’ झाल्याने हा देशातील चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या २४ तासांत युट्यूबवर ‘मन की बात’ व्हिडिओला डिसलाइक करण्याचा संघटीत प्रयत्न झाला. कॉंग्रेसचा आत्मविश्वास इतका कमी आहे की त्यांनी विजय झाल्यासारखं ते साजरा करत आहेत. पण डिसलाइकपैकी फक्त २ टक्के नागरिक हे भारतातील आहेत. हे यूट्यूबच्या डेटावरून दिसून येतंय, असं भाजपचे आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट करून सांगितलं.

‘नेहमीप्रमाणे उर्वरित ९८ टक्के हे भारताबाहेरील आहेत. विदेशातील बॉट्स आणि ट्विटर अकाउंटस कॉंग्रेसच्या जेईई-नेटविरोधी मोहिमेचा कायमचा भाग राहिले आहेत. राहुल गांधींच्या तुर्कीतील बॉट्सची सक्रियता खूप वाढली आहे. राहुल गांधींना तुर्कीचा एवढा पुळका का आहे?’ प्रादेशिक आणि इतर विभागांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कॉंग्रेस अनेक हँडल्सनी ‘मन की बात’चा व्हिडिओ ‘डिसलाइक’ करण्यासाठी मोहीम राबवली होती, असं मालवीय म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here