पिंपरी: पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगत ‘ ‘चे माजी मावळ तालुका अध्यक्ष यांनी पोलीस आयुक्तालयात आज सायंकाळी आत्महत्येचा प्रयत्न केला. छाजेड आयुक्तालयात येऊन फिनेल प्यायले की ते बाहेरून फिनेल पिऊन आले हे समजू शकलेले नाही. या घटनेमुळे मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे.

वाचा:

अमित माणिक छाजेड (रा. पोर्टर चाळ, देहूरोड) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या “रिपाइं’च्या माजी पदाधिकाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी केलेले अतिक्रमण हटविण्यासाठी अमित छाजेड यांनी उपोषण सुरू केले होते. हे उपोषण मागे घेण्यासाठी व्यापारी संघटनेकडून दोन लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी छाजेड यांच्यावर ठाण्यात शनिवारी (२९ ऑगस्ट) खंडणीचा गुन्हा दाखल झाला. छाजेड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ‘ रिपाइं ’मधून त्याची तत्काळ हकालपट्टी करण्यात आली आहे.

वाचा:

आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केला. तसेच देहूरोड पोलीस आपले म्हणणे ऐकून घेत नाहीत, असे कारण सांगत छाजेड सोमवारी सायंकाळी आयुक्तालयात आले होते. तेव्हा त्यांना उलट्या होऊ लागल्या, तेव्हा आपण फिनेल प्यायल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. ही बाब लक्षात येताच पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाली. चिंचवड पोलिसांनी छाजेड यांना सुरुवातील तालेरा आणि त्यानंतर पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले असून, सध्या छाजेड यांच्यावर उपचार सुरू आहेत. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी छाजेड यांच्यावर चिंचवड पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here