अनंत पाताडे, सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यातील डेगवे या गावातील ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेला तरुण योगेश देसाई यांनी आपल्या गावात मशरूम शेती आणि त्याला जोड म्हणून भाजीपाला लागवड केली आहे. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचे शिक्षण मुंबईत घेतल्यानंतर मेट्रोसिटी मध्ये नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय सुरू करावा या उद्देशाने योगेश देसाई हा तरुण गावी आला आणि त्यांनी शेतात मशरूम या पिकासह भाजीपाल्याची लागवड केली.

योगेश यांना मशरूम शेती संदर्भात मित्राने माहिती दिली. त्यानंतर त्यांनी मशरूम शेती करण्याचा निर्णय घेतला. गेल्या सहा वर्षांपासून देसाई यांची मशरूमची लागवड यशस्वीपणे सुरू आहे. सुरुवातीला प्रथम गवत 12 तास पाण्यामध्ये पूर्णता भिजवून ठेवले जाते त्यानंतर बॉईल मशीनमध्ये कीटक मारण्यासाठी बॉईलं केलं जातं. त्यानंतर छोटं-छोटं गवत कटींग करून पाच किलोच्या गवताने पिशव्या भरून घेतल्या जातात. पुन्हा त्यामध्ये गव्हापासून बनवलेलं मशरूमच बी पिशवीमध्ये टाकलं जात. त्यानंतर २० दिवस संपुर्ण काळोखामध्ये ठेवलं जातं. ही प्रकिया झाल्यानंतर पाच दिवसांनी पिशवी फाडून मशरूम बाहेर काढलं जातं. साधारण पाच किलोच्या बॅगमध्ये दोन किलो एवढे एका बॅगमध्ये मशरूम मिळतात अशी माहिती योगेश यांनी दिली.

परदेशात १६ वर्षे नोकरी करून गावाकडे परतला, आज शेळीपालनातून घेतोय लाखोंचं उत्पन्न

देसाई यांच्या गावापासून गोवा हे राज्य काही अंतरावर आहे. त्यामुळे त्यांना गोवा मार्केट उपलब्ध झालं आहे. गोव्यात मोठ्या प्रमाणात मशरूमची मागणी आहे. जवळपास महिन्याला २०० ते २५० किलो महिन्याला मशरूम मी गोव्याला पाठवतो. तसेच मशरूमला गोव्यात २५० किलो दराने भाव मिळतो. गोव्यातून आठ टनाची महिन्याला मागणी आहे. परंतु, मॅन पॉवर नसल्यामुळे मी तेवढा पुरवठा करू शकत नाही. अशी माहितीही योगेश देसाई यांनी दिली.

मशरूमला जोड व्यवसाय म्हणून देसाई यांनी भाजीपाल्याची आपल्या पडीक जमिनीत लागवड केली आहे. त्यामध्ये काकडी,भेंडी,वाल, पाले भाजी,शेवगा, पपई,अशी विविध प्रकारची पालेभाजी लावल्या आहेत. वर्षाच्या १२ महिने पालेभाजी सुरू असते. महिन्याला पाच टन भाजीपाला लोकल मार्केटला विकतो. त्याप्रमाणे मशरूम आणि भाजीपाला याचं महिन्याला उत्पन्न इतर खर्च वगळून एक लाख ते सव्वा लाखांपर्यंत सरासरी उत्पन्न मिळतं असे देसाई म्हणाले.

Agri Success Story : पाणी आणि खताचं परफेक्ट नियोजन, वांगी शेतीतून शेतकऱ्यानं करुन दाखवलं, लाखोंची कमाई

कोकणातील मुलं मुंबई ,पुणे अशा मेट्रोसिटीमध्ये नोकरी करण्याला प्राधान्य देताना पाहायला मिळतात. मात्र, योगेश देसाई यांनी मुंबईत शिक्षण घेतल्यानंतर मेट्रोसिटीमध्ये नोकरी न करता त्यांनी आपल्या मूळ गावी येऊन आपला व्यवसाय उभा केला. त्यामुळे त्यांचं सर्व स्तरावरून मोठं कौतुक होताना पाहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here