कल्याण : कल्याण पश्चिमेकडे राहणारी नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेली एक महिला पोलीस कर्मचारी अचानक बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही तरूणी गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. या प्रकरणी सदर तरुणीच्या कुटुंबीयांनी कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी बेपत्ता तरूणीचा शोध सुरू केला आहे.

या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमध्ये राहणारी महिला पोलिस कर्मचारी अचानक बेपत्ता झाली. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तशी तक्रार दाखल केली. ही तरूणी नवी मुंबईतील एका पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहे. गेल्या काही दिवसांपासून ती कामावर देखील गैरहजर आहे.

Pawar vs Modi : मोदी यांनी फडणवीसांचे मार्गदर्शन घेतलेले दिसते; शरद पवारांची खोचक टीका
१५ ऑगस्टनिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाला देखील ती गैरहजर होती. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांकडून या महिला पोलिसाचा शोध सुरु आहे. याच दरम्यान पोलिसांकडे आणखी एक महिती समोर आली आहे. नवी मुंबईतील एका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला कर्मचारी देखील गेल्या दोन दिवसांपासून कामावर आलेला नाही. बेपत्ता महिला पोलिस आणि कामावर गैरहजर असलेला हा कर्मचारी यांच्यात प्रेमसंबंध असल्याची चर्चा आहे.

राज्यात गतिमान प्रशासनाचा माणगाव पॅटर्न; महसूल विभागात फक्त १० दिवसांत मुलीला मिळाली अनुकंपा तत्त्वावर नोकरी
ही तरूणी त्या कर्मचाऱ्यासोबत निघून गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जोपर्यंत ही तरूणी सापडत नाही तोपर्यंत या प्रकरणाचा उलगडा होणार नाही. बेपत्ता असलेल्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांकडून अद्याप कोणताही संपर्क साधला नसल्याने दोघांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. पोलिसांनी सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. बेपत्ता झालेल्या तरुणीचा लवकरात लवकर ठावठिकाणा लागण्यासाठी पोलिसांनी तपासचक्रांना वेग दिला आहे.

चिंताजनक! स्वातंत्र्याला झाली ७६ वर्षे, तरी नाशिकमधील आदिवासी बांधव सोयीसुविधांपासून वंचित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here