मुंबई: क्रॉफर्ड मार्केट परिसरात काल रात्री एका खासगी कारला झालेल्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर कार चालकासह चौघे जखमी झाले आहेत. जखमींवर जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सोमवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास ही घटना घडली. भरधाव वेगात असलेली कार चार पादचाऱ्यांना धडक देत ‘कॅफे जनता’ या रेस्टॉरंटच्या भिंतीला जाऊन आदळली. यात चौघांचा मृत्यू झाला तर, चौघे जखमी झाले. त्यात कार चालक समीर इब्राहिम सय्यद याचाही समावेश आहे. सर्व जखमींवर जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.

वाचा:

अपघात झाला तेव्हा सय्यद हा एकटाच कारमध्ये होता. तो दारू पिऊन कार चालवत होता का, याची चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त राजीव जैन यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातातील कार चालकावर तीन महिन्यांपूर्वी दुसऱ्या एका अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल आहे. जून महिन्यात भेंडी बाजारात त्यानं एका १२ वर्षीय मुलीला कारची धडक दिली होती.

मृतांची नावे झुबेदा खान (६०), सरोज नायडू (६५) आणि सायरा बानू (६०) अशी आहेत. एकाची ओळख पटू शकलेली नाही.

आणखी वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here