नंदुरबार : एटीएमसाठी कॅश पुरवठा करणाऱ्या व्हॅनमधून कर्मचाऱ्यांनेच तब्बल एक कोटी पाच लाखांची रक्कम घेऊन पसार झाल्याची घटना नंदुरबार शहरातून समोर आली आहे. नंदुरबार शहरातील धुळे चौफुली परिसरातून ही समोर आली असून तब्बल दोन तासांनी पोलिसांना या बाबत माहिती दिली. तोपर्यंत आरोपी पळ काढण्यात यशस्वी झाला. आरोपीचा शोध घेण्यासाठी जिल्ह्याभरात पोलीस दलाने ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बँकेत एटीएमसाठी कॅश पुरवठा करणाऱ्या व्हॅनमधील कर्मचाऱ्याने एक कोटी पाच लाख लंपास केले. ही घटना दिनांक १४ ऑगस्ट रोजी धुळे चौफुली परिसरात घडली. शहरातील स्टेट बँकेचे मुख्य शाखेतून रायटर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एक कोटी पाच लाखाची रक्कम सोमवारी दुपारी घेतली ती सात एटीएम मध्ये भरली जाणार होती. सुरक्षेची पुरेपूर व्यवस्था असलेले वाहन घेऊन चालक सुरक्षारक्षक आणि तीन कर्मचारी निघाले होते.

लव्ह जिहादचा आरोप करत तरुणाला बेदम मारहाण, मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेरील प्रकार
धुळे चौफुलीवर त्यातील राकेश चौधरी यांनी टोकारतालाव रस्त्यावरील एटीएम मध्ये भरणा करण्यासाठी २० लाखांऐवजी संपूर्ण १ कोटी ५ हजाराची रक्कम घेऊन दुचाकी वरून निघाला. त्यानंतर तो फरार झाला असून त्याकडे इतकी मोठी रक्कम दिलीच कशी?, कॅश पुरवठा करणारे वाहन का नेले नाही?, दुचाकीवरून तो का गेला? असे प्रश्न उपस्थित होत असून सरकारी कर्मचाऱ्यांचीही याबाबत चौकशी सुरू आहे.

वंचित फॅक्टरने काँग्रेसचा गेम केला, पण २०२४ च्या यशस्वी राजकारणासाठी आंबेडकरांना त्यांचीच गरज!
व्हॅनमधील कर्मचारी एक कोटीची रक्कम घेऊन पसार झाल्यानंतर तब्बल दोन तासांनी ११२ वरून पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर पोलीस दलाने आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आले आहे.

Pawar vs Modi : मोदी यांनी फडणवीसांचे मार्गदर्शन घेतलेले दिसते; शरद पवारांची खोचक टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here