मुंबई: एका तरुणाशी १८०० रुपयांच्या हिशेबावरून वाद घालणाऱ्या काकूंचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून काही जण काकूंबद्दल सहानुभूती व्यक्त करत आहे. तर, काहींनी काकूंचं थेट समर्थन केलं आहे. अशाच एका काकांचा व्हिडिओ देखील आता व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडिओत हे काका १८०० रुपयांसाठी काकूंची बाजू घेऊन युक्तिवाद करत आहेत. काकूंच्या कामाच्या, कष्टाच्या पैशात घोळ घालणाऱ्या टवाळखोर पोरांचा त्यांनी निषेध केला आहे. पंधराशे म्हणजेच पाचशेच्या तीन नोटा आणि तीनशे रुपये हे कधीच १८०० झालेले नाहीत. आताही होणार नाहीत आणि भविष्यातही कधी होणार नाहीत. देशाच्या सत्ता बदलतील, पंतप्रधान बदलतील, मुख्यमंत्री बदलतील पण ५०० च्या तीन नोटा आणि ३०० रुपये हे कधीच १८०० होणार नाहीत,’ असं या काकांचं म्हणणं आहे. ‘१८०० रुपये मागणाऱ्या मावशी मराठी आहेत. ठाकरे सरकारच्या राजवटीत त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यांची फसवणूक होत आहे. त्यामुळं काकूंच्या फसवणुकीची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी काका करत आहेत. ‘उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी राजीनामा द्यावा, अशीही मागणी या काकांनी केली आहे.

मोदींनीही मावशीचे १५ लाख बुडवले!

मोदी सरकारवरही या काकांनी टीका केली आहे. ‘पंतप्रधान मोदी यांनी या मावशीचे आधीच १५ लाख रुपये बुडवले आहेत. अशा प्रकारे किती जणांना त्यांनी पैसे माफ करायचे? किती सहन करायचे? त्यांच्या अशिक्षितपणाचा, कष्टाळू वृत्तीचा गैरफायदा घेतला जातोय,’ असा संताप काकांनी व्यक्त केलाय. ‘तुम्ही मला कुठूनही १८०० रुपये आणून द्या. मी मावशीला देतो,’ अशी मागणी देखील त्यांनी सरकारकडे केलीय.

वाचा:

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here