मुंबई: सुशांतसिंह प्रकरणाच्या सीबीआय तपासावरून सुरू झालेली राजकीय टीका-टिप्पणी अजूनही थांबायला तयार नाही. या प्रकरणात राज्य सरकारवर व मुंबई पोलिसांवर टीका करणारी बॉलिवूडची अभिनेत्री हिला काँग्रेसनं एका व्यक्तीपासून जपून राहण्याचा सल्ला दिला आहे.

आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण लागल्यानंतर विरोधी पक्ष भाजपनं सीबीआय चौकशीची मागणी लावून धरली होती. राज्य सरकारनं मुंबई पोलिसांवर विश्वास व्यक्त ही मागणी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली होती. याच दरम्यान कंगना राणावत हिनं बॉलिवूड आणि ड्रग माफिया यांच्यातील संबंध चव्हाट्यावर आणण्याची तयारी दाखवली होती. भाजपचे आमदार यांनी कंगनाला पाठिंबा दिला होता. ‘कंगनाला संरक्षणाची गरज आहे. मात्र, तिनं माहिती देण्याची तयारी दाखवून चार दिवस उलटल्यानंतरही दुर्दैवानं महाराष्ट्र सरकारनं तिला संरक्षण दिलं नसल्याचं राम कदम यांनी म्हटलं होतं.

वाचा:

कंगनानं त्या ट्वीटला रीट्वीट करत राम कदम यांचे आभार मानले होते. ‘खरंतर गुंड आणि मुव्ही माफियांपेक्षा मला आता मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. मला एकतर हिमाचल प्रदेश सरकारची किंवा थेट केंद्राची सुरक्षा हवी आहे. मुंबई पोलिसांची नको, प्लीज,’ असंही त्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

कंगनाच्या या ट्वीटमुळं शिवसेनेचे खासदार संजय राऊत भडकले होते. ‘मुंबई पोलिसांची भीती वाटत असेल तर चंबूगबाळं आवरून आपल्या राज्यात निघून जा,’ असं त्यांनी कंगनाला सुनावलं होतं. त्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते यांनी कंगनाचं तेच ट्वीट रीट्वीट करून कंगनाला खोचक व सूचक सल्ला दिला आहे. आपल्या ट्वीटमध्ये सावंत म्हणतात, ‘कंगना, तू ज्याचे आभार मानतेस, त्याच व्यक्तीपासूनच तुला खरी भीती वाटायला हवी. कारण, ती व्यक्ती मुलींच्या बाबतीत अत्यंत खतरनाक आहे.’

दहीहंडी महोत्सवात भाषण करताना राम कदम यांनी मुलींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. त्याच अनुषंगानं सचिन सावंत यांनी हे ट्वीट केलं आहे. त्यांनी कदम यांचं थेट नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख थेट आणि स्पष्ट आहे.

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here