नाशिक : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन भाविकांना सुलभ व्हावे याकरिता यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थानने विशेष व्यवस्था केली आहे.अत्यंत पवित्र आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे. त्यामुळे श्रावणात ज्योतिलिंग श्री त्र्यंबकेश्वर मंदिरांत दर्शनासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. भाविकांची हजारोंच्या संख्येने होणारी गर्दी लक्षात घेऊन विश्वस्त समिती, पोलिसांच्या वतीने खास नियोजन करण्यात आले आहे. यासाठी बॅरेकेट्स लावण्यात येणार आहे. अधिक मासातही लाखो भाविकांनी ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. त्यामुळे श्रावण महिन्यात होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर हे नियोजन करण्यात आले आहे.

श्रावणात त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. भाविकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांच्या सोयीसाठी त्र्यंबकेश्वर देवस्थानने व्हीआयपी दर्शन बंदचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. त्यानंतर आता सुलभ दर्शनासाठी वेळेचे देखील नियोजन करण्यात आले आहे. ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांना वातानुकूलित दर्शनबारीची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे हजारो भाविक दर्शनासाठी उभे राहू शकतील. ज्येष्ठांना या दर्शनरांगेत बसण्याची व्यवस्था असून पिण्याचे पाणी तसेच प्राथमिक आरोग्य कक्ष तयार करण्यात आला आहे. स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष उपलब्ध करून देण्यात आल्याने भाविकांचे दर्शन सुलभ होऊ शकणार आहे.

कमला एकादशी निमित्त संतनगरीत भक्तांची मांदियाळी, ५-६ तास रांगेत उभं राहून भाविकांनी घेतलं श्रींचं दर्शन

दररोज सकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत दर्शनाची सुविधा:

प्रत्येक श्रावणी सोमवारी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेता येणार आहे. त्र्यंबकेश्वरच्या गावकऱ्यांना उत्तर महाद्वारातून प्रवेश दिला जाईल. सकाळी मंदिर उघडल्यापासून १०.३० वाजेपर्यंत आणि सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत दर्शन घेता येईल. स्थानिक रहिवासी असल्याचा पुरावा मात्र सोबत ठेवावा लागेल. देणगी दर्शनरांग उत्तर दरवाजातून सुरू होईल, असे विश्वस्त मंडळाने स्पष्ट केले आहे.

त्रंबकेश्वर येथे राज्यसह देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात विशेष करून श्रावण महिन्यात भाविकांची जास्त गर्दी होत असते त्यामुळे श्रावणासाठी ज्योर्तिलिंग श्री त्र्यंबकेश्वर मंदिरासह नाशिक शहरातील प्रमुख शिवमंदिरांत दर्शनासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

स्वातंत्र्य दिन होत नाही, तोच वाहनचालकांच्या खिशाला फटका, पेट्रोलच्या किमतीत घसघशीत वाढ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here