म. टा. प्रतिनिधी ।

विवाहित तरुणाला गे चॅट अ‍ॅपवरून भेटण्यास बोलवत त्याला लुटणाऱ्या मुख्य आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. सापळा रचून या आरोपीला अटक करण्यात आली. जतीन संतोष पवार (वय १८, मांजरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

दोन दिवसांपूर्वी सिंहगड रोड परिसरात हा प्रकार घडला होता. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी ३४ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली होती. तक्रारदार हे धायरी परिसरात राहण्यास आहेत. त्यांचा विवाह देखील झाला आहे. त्याने काही दिवसांपुर्वी गे चॅट अ‍ॅप डाउनलोड केले होते. ९ ऑगस्ट रोजी या अ‍ॅपवर चॅट करताना एका रवी नावाच्या मुलाने तक्रारदार तरुणाला रिक्वेस्ट पाठविली होती.त्यांचे चॅटिंग सुरु होते. त्यानंतर रवीने फिर्यादी तरुणाला पत्ता देउन नांदेड फाटा परिसरातील एका खोलीवर बोलाविले.

वाचा:

त्याठिकाणी रवी व फिर्यादी तरुणाची भेट झाली. या भेटीनंतर बोलत असतानाच या खोलीत तिघांनी प्रवेश केला. तसेच शिवीगाळ करत फिर्यादीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तलवारीचा धाक दाखवून त्याच्याकडील सोन्या-चांदीचे लॉकेट असा ८१ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाले होते. याचा तपास गुन्हे शाखेच्या केला जात होता. युनिट एकचे सचिन जाधव यांना या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा जतीन पवार हा बिबवेवाडी परिसरात येणार आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त बच्चन सिंह, सहाय्यक आयुक्त डॉ शिवाजी पवार, पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, उपनिरीक्षक संजय गायकवाड, कर्मचारी सचिन जाधव, प्रशांत गायकवाड, बाबा चव्हाण यांच्या पथकाने त्याला सापळा रचून अटक केली. आरोपीचे शिक्षण दहावीपर्यंत झालेले आहे. तो मिळेल ते काम करतो. फरार झालेल्या त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here