भवानीनगर: गेल्या २४ तासांत बारामतीत दहा रुग्णांचा मृत्यू झाला. हे रुग्ण बारामतीतील शासकीय दवाखान्यांसह खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेत होते, त्यापैकी एक जण सारीचा संशयित रुग्ण होता.

बारामतीतील रुई कोविड सेंटर, सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालयासह बारामतीतील तीन खासगी मल्टीस्पेशालिटी दवाखान्यांमध्ये सध्या करोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी दहा जणांची प्रकृती अत्यवस्थ बनली होती. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबरच्या पहाटेपर्यंत तब्बल दहा जणांचा यामध्ये मृत्यू झाला. यामध्ये इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर व माढा तालुक्यातील टेंभूर्णी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा अपवाद वगळता इतर सर्व रुग्ण तालुक्यातील आहेत. या आठ जणांमध्ये एक जणाचा मृत्यू करोनाने नाही, तर सारीमुळे झाल्याचे सूत्रांनी सांगितले. तीन रुग्ण आमराई परिसरातील, एक श्रीरामनगर भागातील, एक चोपडज गावातील, शहरातील गोकुळवाडी व भिगवण रस्त्यावरील तीन रुग्ण यांमध्ये समाविष्ट होते. त्यांच्यावर जळोची येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बारामतीत उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णाचा १ जुलै रोजी मृत्यू झाला. तेव्हापासून आतापर्यंत ३९ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. मात्र आज झालेले १० मृत्यू सर्वाधिक आहेत.

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here