मुंबईः करोना व्हायरसला रोखण्यासाठी देशात जवळपास अडीच महिने लॉकडाऊन लागू करण्यात आला होती. या काळात देशात उद्योगधंदे ठप्प पडले. बेरोजगारी वाढली देशांतर्गत वस्तूंचा खप कमी झाला. याची मोठी किंमत अर्थव्यवस्थेला चुकवावी लागली आहे. एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची वाढ नव्हे तर अधोगती झाल्याची कबुली केंद्र सरकारने दिली आहे. पहिल्या तीमाहीत विकासदर २३.९ टक्क्यांने घसरला आहे. यावरून काँग्रेसनं मोदी सरकारवर टीका केली आहे.

काँग्रेस नेते यांनी सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या ‘रसोडे मे कौन था’ या कोकिलाबेन स्टाइलनं केंद्रावर निशाणा साधला आहे. सचिन सावंत यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये मुळं रॅप साँगचं विंडबन केलं आहे. ‘रसोडे मे मोदी जी थे’, असं त्यात म्हटलं आहे. सावंत यांचं हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

घसरल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही केंद्राला फटकारले आहे. पहिल्या तिमाहीत विकासदरात ऐतिहासिक घसरण झाली आहे. विरोधी पक्षांनी सातत्याने केंद्र सरकारला अर्थव्यवस्थेबाबत इशारे दिले होते. त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे, असं ते म्हणाले आहेत.

आजवरची सर्वांत मोठी घसरण

देशात १९९६पासून जीडीपीचे आकडे जारी करण्यात येत आहेत. तेव्हापासूनची ही सर्वांत मोठी घसरण ठरली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक प्रयत्न करीत आहे. रिझर्व्ह बँकेने अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी मार्चपासून रेपो दरात १.१५ टक्क्यांची कपातही केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here