खेळाडूंमधील ड्रग घेण्याचा प्रकार रोखण्यासाठी कोणत्याही खेळाडूंची डोपिंग चाचणी घेतली जाऊ शकते हे सर्वांनाच माहीत आहे. यासाठी संबंधित फेडरेशनला त्याची जबाबदारी देण्यात आली आहे. खेळाडूंची डोपिंग चाचणी जागतिक डोपिंग विरोधी संस्था World Anti-Doping Agency किंवा राष्ट्रीय डोपिंग विरोधी संस्थेद्वारे The National Anti-Doping Agency केली जाते. एखाद्या स्पर्धेच्या अगोदर किंवा प्रशिक्षण शिबिराच्या वेळी नेहमीच डोपिंग चाचणी केली जाते. याच जर एखादा खेळाडू दोषी आढळल्यास त्या खेळाडूला आजीवन बंदी घातली जाईल अशी कायद्यात तरतूद आहे. खेळाडूंसाठी अशा प्रकारची चाचणी अनिवार्य करण्यात आल्याने ड्रग घेण्यावर लगाम लागला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
सारंग यांनी पुढे म्हटले आहे की, ‘अशाच प्रकारे करोनाच्या संकटामुळे देशभरात लॉकडाउन सुरू झाले. त्यानंतर नियमावली तयार करून काही अटींचे पालन करून चित्रपटाच्या शूटिंगसाठी अनुमती देण्यात आली. यात शूटिंगच्या सेटवर येणाऱ्या प्रत्येकाची करोना चाचणी घ्यावी. त्यानंतरच त्यांना सेटवर येण्याची अनुमती मिळावी अशी अट घालण्यात आली आहे. अशाच प्रकारे ड्रग चाचणीबाबत केले जावे. शूटिंगसाठी सेटवर येण्यापूर्वी या सर्वांची डोपिंग चाचणी करण्यात यावी.’
क्लिक करा आणि वाचा-
क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times