मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागात सुसूत्रीकरण आणि कामात गतिमानता आणण्यासाठी लवकरच ‘एक व्यक्ती एक पद’ धोरणाचा अवलंब केला जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. त्यातच सध्या गाजत असलेल्या दोन्ही हंगामी संचालकांविरोधात केलेली कारवाई ही त्यांच्यावर सुरू असलेल्या चौकशीमुळे आणि अॅट्रोसिटीचा ठपका ठेवण्यात आल्याने करण्यात आल्याचा अहवाल आरोग्य विभागाकडून तयार करण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Mumbai News: चिनी खलाशाला हृदयविकाराचा झटका, अरबी समुद्रात रात्री थरार; नेमकं काय घडलं?
दरम्यान, आरोग्य विभागाचे संचालक पद लवकरात लवकर भरण्यासंदर्भात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून लोकसेवा आयोगाकडे कार्यवाही करण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती या वेळी पुढे आली आहे.

राज्यातील आरोग्य विभागातील हंगामी संचालकांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईच्या निर्णयाची चर्चा आरोग्य विभागात सुरू झाली आहे. या निर्णयामुळे सध्या आरोग्य विभागात आरोप-प्रत्यारोपांची राळ उठत असतानाच, याबाबतचा आरोग्य विभागाने सादर केलेला एक अहवाल ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या हाती आला आहे. कोव्हिड काळात हंगामी संचालकांनी रेमडेसिव्हिर साठा केल्याप्रकरणी ठपका ठेवण्यात आला असून, या प्रकरणी सचिव पातळीवर चौकशीचे आदेश देण्यात आल्याने त्यांना पदमुक्त करण्यात आल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे.

आरोग्य विभागात ‘एक व्यक्ती एक पद’ हे धोरण राबविण्यासाठी सहसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी काही महिन्यांपूर्वी आरोग्यमंत्र्यांकडे एक अहवाल सोपवला होता. या अहवालात एका व्यक्तीकडे अनेक पदांचा कार्यभार असल्यामुळे त्यांच्यावरील कामाचा ताण, तसेच कामाला अपेक्षित न्याय देणे शक्य नसल्याने ‘एक व्यक्ती एक पद’ हे धोरण सुचविले होते. त्यानुसार हे धोरण लागू करण्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करण्यात आल्यानंतर या संदर्भातील कार्यवाही सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे; तर हंगामी संचालकांकडून पदाचा कार्यभार काढून घेण्यासंदर्भातील निर्णय हा संचालक पदावर काम करताना, तसेच संबंधित पदास न्याय देण्यास अपयश, असमाधानकारक कामकाज आदी कारणांमुळे केल्याची माहिती आरोग्य विभागातील या नव्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.

पदे भरण्यासंदर्भात कार्यवाही सुरू

याशिवाय सध्या आरोग्य विभागात सध्या १० वर्षांत वेळेवर पदभरती झालेली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पदभरती होणार आहे. यात विशेष म्हणजे, आरोग्य सेवा हे पद नामनिर्देशाप्रमाणे भरण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणी पत्र पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली आहे. तर उपसंचालकांची १२ पदे भरण्यासंदर्भात लोकसेवा आयोगामार्फत कार्यवाही सुरू यासाठी आयोगाकडून मुलाखत आयोजित करण्यात आल्याचे कळते.

Big News : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित, विद्यार्थी संघटनांकडून तीव्र निषेध, नेमकं काय घडलं?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here