एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार’, या जयघोषांसह आज लाडक्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे. दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर जड अंतःकरणाने गणपती बाप्पाला निरोप देण्याचा दिवस म्हणजे अनंतचतुर्दशी. करोनाच्या संकटामुळं बाप्पाचे आगमन शांततेत झालं निरोप देतानाही हे संकट असल्यानं मिरवणुकाही यंदा नाहीत.

करोनामुळं बाप्पाचे समुद्रात विसर्जन न करता कृत्रिमा तलावात करावे यासाठी पालिकेनं जोरदार तयारी केली आहे. बँडबाजा, ढोलताशांच्या गजरात दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा उत्सवावर करोनाचे सावट असल्याने अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. आगमनापाठोपाठ विसर्जन सोहळ्यात गर्दी टाळण्यासाठी मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे.राज्यातील गणेश विसर्जनाचा आढावा.

>> दगडूशेठ गणपतीला भावपूर्ण निरोप; मंडपातच झालं विसर्जन

>> विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जुहू चौपाटी येथील तयारीची गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून पाहणी

>> माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या गणपतीचे विसर्जन

>> पुणेः थोड्याच वेळात दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन मंदिरात बनवलेल्या हौदात होणार

>> पुढच्या वर्षी लवकर या! गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाचं कृत्रिम तलावात विसर्जन

>> बाप्पा निघाले गावाला; घरगुती गणपतींच्या देखाव्यातून करोना योध्दांना सलाम

>> अहमदनगरः ग्रामदैवत विशाल गणपती मिरवणुकीच्या मागेच इतर अकरा मानाचे गणपतीचे विसर्जन होणार

>> विसर्जन मिरवणूकांमुळे दरवर्षी गजबजलेल्या असणाऱ्या गिरगाव चौपटीजवळील सुखसागर पुलावर आज शुकशुकाट होता. दरवर्षी मिरवणूकांमुळे या मार्गावर प्रचंड कोंडी होते.

>> गिरगाव चौपाटीवर घरगुती गणपतीसोबत दोघांना तर सार्वजनिक गणपतीसोबत पाच जणांना सोडण्यात येत आहे

>> मुंबईचा राजाच्या विसर्जनासाठीची तयारी

>> मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीचे विसर्जन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले

>> पुण्यातील दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचे शांततेत विसर्जन

>> मानाचा पहिला कसबा गणपतीचे विसर्जन

>> पाहा व्हिडिओ

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here