अकोला : परिविक्षाधीन आयपीएस (IPS) अधिकारी सुरज गुंजाळ यांच्या एका कारवाईची सध्या चांगलीच चर्चा आहे. गुंजाळ यांनी अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पोपटखेड गावात दारूच्या अवैध विक्रीचा पर्दाफाश केलाय. यावेळी घराच्या स्वयंपाक घरात आणि अंगणात भुयार करून त्यात दारू लपविण्यात आली होती. गुंजाळ यांनी स्वत: हे दारूचे अड्डे उध्वस्त केले. या कारवाईत त्यांनी ३४ हजारांची अवैध दारू जप्त केली असून त्यांच्या कारवाईत दारु जप्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतोय.

कोण कधी अन् कशी शक्कल लढवेल काही सांगता येत नाहीय. देशात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा झाला. पण देशाचा स्वांतत्र्यदिन हा दिवस ‘ड्राय-डे’असतो. या दिवशी दारू मिळत नसल्यानं अवैध दारू विक्रेते अगोदरच्या दिवशी अवैध दारु साठा जमा करून ठेवतात. असाच अवैधरित्या जमा करुन ठेवलेला दारु साठा अकोट ग्रामिण पोलिसांनी ‘ड्राय-डे’च्या दिवशी जप्त केलाय. पोलिस स्टेशन हद्दीतील पोपटखेड गावातील दोन पठ्ठ्यांनी तर कमालच केली होती. त्यांनी दारूचा साठा चक्क घरातील किचन, बेडरूममध्ये खड्डा करून लपवून ठेवला होता. परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी (IPS) सुरज गुंजाळ व त्यांच्या पथकानं अक्षरश: फावड्यानं अन् कुदळनं घरातील खड्डे खोदून ३४ हजार रूपयांचा देशी-विदेशी दारूचा साठा ताब्यात घेतला.

दरम्यान, आयपीएस अधिकारी सुरज गुंजाळ हे यांना १५ ऑगस्ट रोजी दुपारी सुट्टीच्या दिवशी पर्यटनासाठी पोपटखेड येथे येणाऱ्या काही लोकांना अवैध दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पथकासह पोपटखेडमधील दोन घरांमध्ये छापा मारला. छाप्यात पोलिसांच्या हाती दारूच्या बाटल्या लागल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी पथकासह एका महिलेच्या घरातील किचनची पाहणी केली. इथे चक्क किचनच्या बेसिनच्या खाली खड्डा असल्याचं निदर्शनास आलं. तो खड्डा लाकडी वस्तुंनी झाकलेला होता, या खड्ड्यात लपवलेल्या देशी आणि विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. यानंतर त्यांनी दिलीप जयकिशोर जयस्वाल याच्या घरात तपासणी केली असता त्याने बेडरूममधील एका कोपऱ्यात खड्डा करून दारू लपवल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याच्या घरातून ७० विदेशी दारूच्या बाटल्या हस्त केल्या आहेत. ही कारवाई पोलिस कर्मचारी उमेशचंद्र सोळंके, शंकर जायभाये, शैलश जाधव यांनी केली.

दरम्यान, परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी सुरज गुंजाळ यांच्यासह त्यांच्या पथकाने घरातील कानाकोपऱ्यात लपवून ठेवलेल्या दारूच्या बाटल्या खोदून-खोदून बाहेर काढल्या. घरात अनेक ठिकाणी दारु लपवलेली होती. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, अनेकांनी तर सब गोलमाल है भाई असे टायटल देऊन पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले.

अपत्यप्राप्तीसाठी औषध देण्याचे आमिष, दाम्पत्याला संशय, भोंदूंची टोळी अशी अडकली जाळ्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here