चंदिगढ : जेवणातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील तीन लहान मुलांचा मृत्यू झाला, तर कुटुंबातील सहा जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हरियाणातील रोहतक येथील शिवाजी कॉलनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बलंद गावात ही दुर्दैवी घटना घडल्याचं समोर आलं आहे. १५ ऑगस्टच्या रात्री घरीच तयार केलेली भोपळ्याची भाजी खाल्ल्यानंतर कुटुंबाची तब्येत बिघडली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत

१५ ऑगस्टच्या रात्री बालंद येथील एकाच कुटुंबातील नऊ जण आजारी पडले. घरी पेठे की सब्जी अर्थात भोपळ्याची भाजी खाऊन कुटुंब झोपी गेले. रात्री उशिरा उलट्या होत असल्यामुळे संपूर्ण कुटुंब डॉक्टरांकडे उपचारासाठी गेले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना औषध देऊन घरी पाठवले. मात्र यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले.

चंद्रभागा नदीपात्रात २३ वर्षांपूर्वी सापडलेली, अनाथांचे नाथ शंकरबाबांच्या लेकीला ‘नवा जन्म’
राजेश यांच्या मुली दिव्या (७ वर्षे) आणि इयांशु (२ वर्षे) आणि राकेश यांची मुलगी लक्षिता (८ वर्षे) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर गणिका (१० वर्षे) हिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. कुटुंबातील इतर सदस्य राकेश आणि त्याची पत्नी मोनिका, राजेश आणि त्याची पत्नी सीमा, राजेशचा मोठा मुलगा जतीन (१० वर्षे) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

I am very much safe! ज्या नर्मदेवरुन सना खानने केलेलं फेसबुक लाईव्ह, त्याच नदीत आता बॉडी
राजेश आणि राकेश हे दोघे सख्खे भाऊ बालंद गावात आपल्या परिवारासह राहत होते. सध्या कोणीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. डॉक्टरांनी त्यांना देखरेखीखाली ठेवले आहे.

मुल होण्यासाठी उपचार घ्यायला गेलेल्या महिलेचा मृत्यू; कुटुंबियांचा आक्रोश, डाॅक्टरांवर गंभीर आरोप

घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. कुटुंबातील ६५ वर्षीय सदस्य कृष्णा यांनी पोलिसांना सांगितले की, काल रात्री घरी भोपळ्याची भाजी तयार करण्यात आली होती. जेवून सर्व जण झोपले. नंतर मध्यरात्री त्यांची प्रकृती खालावली. राकेश शेतीची कामे करतो. राजेश ट्रान्सपोर्टमध्ये काम करतो. सध्या सर्वांवर उपचार सुरू आहेत.

“एकाच कुटुंबातील 9 जणांची प्रकृती खालावल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तिघीही मुली आहेत. उर्वरित सदस्यांवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गुरुवारी कुटुंबीयांचा जबाब व तक्रारीच्या आधारे कारवाई करण्यात येणार आहे. अन्नाचे नमुनेही घेतले जाणार आहेत” असे शिवाजी कॉलनी पोलिस स्टेशनचे तपास अधिकारी अशोक कुमार यांनी सांगितले.

कुटुंबात कोण कोण

राकेश, पत्नी मोनिका, मुलगा जतीन (१० वर्ष), मुलगी लक्षिता (८ वर्ष – मृत्यू)
राजेश, पत्नी सीमा, मुली गणिका (१० वर्ष), दिव्या (७ वर्षे – मृत्यू) आणि इयांशु (२ वर्ष – मृत्यू)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here