धुळे: सिव्हील इंजिनिअरींगचे शिक्षण पुर्ण झालेल्या २४ वर्षीय तरुणीने तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिरपूर पोलीसांनी धाव घेत स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने तरुणीचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आला.

अरेरे! NEETमध्ये दोनदा अपयश, लेक खचला, सगळं संपवून बसला; दुसऱ्या दिवशी बापाचं टोकाचं पाऊल

सकाळच्या सुमारास एका तरुणीने शिरपूर तालुक्यातील सावळदे पुलावरून तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोर्णिमा पाटील, अनिता पावरा, यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. या तरुणीचा सावळदे गावाजवळील असलेल्या निम्स कॉलेज हद्दीत मच्छीमारांच्या मदतीने मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आला त्यानंतर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलीसांनी सोशल मिडीयावर फोटोसहीत ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले होते.

रॅगिंग, रुद्र दादा अन् ड्रग्ज; मृत विद्यार्थ्याची डायरी सापडली; पण तारखेनं संशय वाढवला

त्यानंतर सदर तरुणीची ओळख पटली असून तरुणीचे नाव नंदिनी रवींद्र खैरणार (वय २४ रा. सोनगीर हल्ली, मुक्काम साईदर्शन कॉलनी धुळे) असे असून नंदिनी खैरणार हिचे सिव्हील इंजिनिअरिंगचे शिक्षण झाले आहे. नंदिनी खैरणार नाशिक येथे पुढील शिक्षण घेत होती. ती नाशिक येथून काल धुळे येथे घरी आली होती. सकाळी मैत्रीणीकडे जाऊन येते असे सांगून नंदिनी घराबाहेर निघाली. मात्र, ती परत परतली नाही. यानंतर तिचा शोध सुरु असताना ती कुठेही सापडली नाही. नंदिनी खैरणार यांच्या पश्चात आई, वडील व लहान भाऊ आहे. नंदिनीने आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here