बीड: बीडच्या आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या सल्ल्यामुळे ते चर्चेत आले आहेत. अधिकारी पैसे घेत असतील तर चपलेने मारा बघू काय होतं ते असा सल्ला आमदारांनी बीडच्या आणि मतदारसंघातील शेतकऱ्यांना दिला आहे. आमदार बाळासाहेब आजबे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सत्तेतील आमदार आहेत. १५ ऑगस्ट रोजी आयोजित बैठकीमध्ये शेतकऱ्यांनी तक्रारीचा पाढा वाचल्यानंतर आमदारांनी थेट अधिकाऱ्यांना चपलेने मारण्याचा शेतकऱ्यांना सल्ला दिला. अधिकारी पैसे घेत असतील तर चपलेने मारा.. बघू पुढे काय होतं ते असं म्हणत असतानाचा आमदार आजबे यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

सध्या काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे तर काही ठिकाणी पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना एक ना अनेक प्रश्न उद्भवत आहेत. त्याचबरोबर अनेक वेळा कोणत्या ना कोणत्या योजनेसाठी किंवा योजनेचे लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांच्या चौकटीवर वारंवार चकरा माराव्या लागतात. अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्यासाठी किंवा अधिकाऱ्यांची सही एखाद्या फाईलवर मिळवण्यासाठी अनेक गोष्टींना आणि अनेक संकटांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. संकटकाळातही अधिकारी पैसे मागत असल्याचं अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी या आमदार बाळासाहेब आजबे यांच्यापर्यंत पोहोचल्या.

केशर काकूंची आठवण सांगितली, शरद पवारांनी संदीप क्षीरसागरांची पाठ थोपटली

या सगळ्या तक्रारींचा आढावा घेत असताना आमदार बाळासाहेब आजबे यांनी १५ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या आढावा बैठकीमध्ये काही शेतकऱ्यांनी अधिकारी कामासाठी पैसे मागतात अशी तक्रार केली. यावर बोलताना आमदार बाळासाहेब आजबे यांनी ‘जो अधिकारी कर्मचारी पैसे मागेल त्याला तिथेच चपलेने मारा’ असा अजब सल्ला दिला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र, हा सल्ला दिलेला चांगला की वाईट हा संशोधनाचा जरी प्रश्न असला तरी शेतकऱ्यांना हा सल्ला दिलेला आवडला असल्याचं सोशल मीडियावर पहायला मिळतयं.

लाखो तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा; तलाठी भरतीचा पेपर पहिल्याच दिवशी फुटला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here