बारामती : राष्ट्रवादीत फूट पडून दीड महिना उलटला. मात्र आतापर्यंत बारामतीत पवार कुटुंब फिरकलेलं नव्हतं. दोन दिवसांपूर्वी सांगोल्याच्या दौऱ्यासाठी जायला शरद पवार घाईघाईत बारामतीला आले आणि आज सुप्रिया सुळे… सांत्वनपर भेटीच्या निमित्ताने सुप्रिया सुळे यांनी बारामतीचा दौरा केला. या दौऱ्याअगोदर खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेमके कोणते कार्यकर्ते-पदाधिकारी असणार त्याची उत्सुकता सर्वांनाच होती‌. कारण राष्ट्रवादीचे बहुतांश पदाधिकारी हे अजित पवार यांच्या गटात सामील झालेले आहेत‌‌. काल-परवा शरद पवार आल्यानंतर देखील या पदाधिकाऱ्यांनी गोविंद बागेकडे पाठ फिरवली होती. त्या पार्श्वभूमीवर ही उत्सुकता अधिकच ताणली गेली होती. परंतु आज सुप्रिया सुळे यांच्यासोबत शहरातील महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. हेच चित्र पाहून पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना मुद्द्याचा प्रश्न विचारला.

राष्ट्रवादी तर फुटली मग तुमच्याबरोबर तेच कार्यकर्ते; दादांबरोबरही तेच कार्यकर्ते.. ताई असं कसं? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “बारामतीमध्ये कार्यकर्ते नाहीत तर ते सगळे आमच्या कुटुंबाचा एक भाग आहेत. बारामती हे माझं माहेर आहे. आजोळ आहे आणि माझी कर्मभूमी देखील आहे. म्हणून राजकारण राजकारणाच्या ठिकाणी… आमचे वैचारिक मतभेद आहेत पण मनभेद नाहीत. त्यामुळे हा विचारांचा लढा आहे तो विचारांच्या पद्धतीने सुरू राहील. आणि हे कार्यकर्ते नाहीत तर ही जोडलेली माणसं आहेत, प्रेमाची माणसं आहेत म्हणून ती बरोबर आहे”

मुंडे बहीण भावाच्या सगळ्या खाचाखोचा माहिती, धनुभाऊंचा खास दोस्त पवारांच्या गळाला कसा लागला?
त्यानंतर सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी याचविषयी आणखी बोलतं करण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या, “आम्ही राजकारण करण्यासाठी नाही तर समाजकारणासाठी राजकारणात आलो आहोत आणि संपूर्ण पवारांची पिढी तशीच आहे. अगदी शरद पवार यांच्या सख्ख्या भगिनी सरोज पाटील यांचे पती एन. डी. पाटील हे शेतकरी कामगार पक्षात होते अर्थात ते जरी शेतकरी कामगार पक्षात असले आणि वारंवार काँग्रेसवर विशेषतः शरद पवारांवर टीका करत असायचे. तरी शरद पवार किंवा पवार कुटुंबाचे आणि पाटील कुटुंबाच्या नातेसंबंधात कुठलीही उणीव किंवा कमतरता आलेली दिसली नाही. त्यामुळे राजकारण समाजकारण आणि कुटुंब हे वेगवेगळे ठेवण्यासाठी पवार कुटुंब प्रगल्भ आहे”

संदीप, तुझी आजी आज आकाशातून आनंदाने बघत असेल, माझा नातू जिल्ह्याचा नेता झाला, आव्हाडांचं जोरदार भाषण
यावेळी सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या निर्णयांवर टीका केली. त्या म्हणाल्या, “तब्बल ३१ दिवस आम्ही इंडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर मणिपूरमधील महिलांवरील झालेल्या अत्याचार तसेच महागाई यावर सातत्याने केंद्र सरकारवर टीका केली. त्याचा परिणाम असा झाला की केंद्र सरकार आता महागाई कमी करण्याच्या विचारत आहे. अर्थात महागाई कमी करण्यासाठी ते काय उपाय करतात, यावर सारे अवलंबून असेल. आम्ही काय सांगतोय ते केंद्र सरकारला पटले तरी खूप झाले”

दादासोबतही तेच कार्यकर्ते अन् तुमच्यासोबतही तेच?; पत्रकाराच्या प्रश्नाला सुप्रिया सुळेंचं उत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here