जम्मू: करोना व्हायरसचा प्रादुर्भाव असूनही केंद्र सरकारने अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची देशभरात प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर एका दहशतवादी आरोपीनेही ही परीक्षा देण्याची मागणी केली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील ( ) आरोपी वैज-उल-इस्लामने जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) द्यायची आहे. असं त्याने जामीन अर्जात म्हटलं आहे. वैज-उल-इस्लाम हा श्रीनगरमधील रहिवासी आहे. पुलवामा हल्ल्यासाठी बॉम्ब बनवण्याचे साहित्य खरेदी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

वैज-उल-इस्लामने एनईईटी परीक्षा देण्यासाठी जामीन अर्ज दाखल केला आहे. आमचा या जामिनाला विरोध आहे. प्रकरणातील पुढील सुनावणी १५ सप्टेंबरला आहे. नीटच्या परीक्षा देण्याची त्याची मागणी आहे, जम्मूतील एनआयएचे वकील विपीन कालरा यांनी सांगितलं.

मार्चमध्ये केली होती अटक

१९ वर्षीय वैज याची चौकशी करण्यात आली. जैश ए मोहमदच्या दहशतवाद्यांना आयईडी बनवण्यासाठी रसायनं आणि बॅटरी खरेदी करून दिल्याचं त्याने चौकशीत कबुल केलंय. त्या गेल्या मार्चमध्ये अटक करण्यात आली होती.

पुलवामा हल्ल्यात ४० हून अधिक जवान शहीद

गेल्या वर्षी १४ फेब्रुवारीला पुलवामामध्ये दहशवादी हल्ला झाला होता. स्फोटकांनी भरलेली कार सुरक्षा दलांच्या ताफ्यात घुसली आणि एका बसला जाऊन धडली. यावेळी झालेल्या भीषण स्फोटात ४० हून अधिक जवान शहीद झाले. या घटनेत आदिल अहमद डारने आत्मघातकी हल्ला केला. या प्रकरणी तपास करणाऱ्या एनआयएने १३,५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यात जैश ए मोहमदचा प्रमुख मसूद अझहर आणि त्याचा भाऊ अब्दुल रऊफ असगर यांना आरोपी करण्यात आलं आहे. याशिवाय ठार झालेला दहशतवादी मोहमद उमर फारूक, आत्मघातकी हल्लेखोर आदिल अहमद डार आणि पाकिस्तानात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांच्या इतर कमांडर्सच्या नावांचा समावेश आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here