नगर: दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्या पत्राला लेखी उत्तर दिल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक यांनी आता एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यातून गुप्ता आणि भाजपला खडे बोल सुनावतानाच आपला राजकीय पक्षांशी संबंध जोडणाऱ्यांवरही अण्णा भडकले आहेत. ( On Leader Aadesh Gupta ‘s Letter )

वाचा:

गेल्या आठवड्यात दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षांनी अण्णा हजारे यांना पत्र पाठवून दिल्लीचे मुख्यमंत्री सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात भाजपने पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते. यावर हजारे यांनी लेखी पत्र पाठवून हे निमंत्रण नाकारताना भाजपला खडे बोल सुनावले होते. त्यानंतर आज हजारे यांच्याकडून एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याद्वारे पुन्हा एकदा गुप्ता यांना उत्तर दिले आहे. हे सुरू असताना सोशल मीडियाद्वारे हजारे यांच्यासंबंधी विविध मते व्यक्त होत होती. त्यांचाही हजारे यांनी समाचार घेतला आहे.

‘२२ वर्षे मी देशासाठी भष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करीत आहे. यामुळे ज्या पार्टीचे नुकसान होते, ते माझे नाव दुसऱ्या पार्टीशी जोडून लोकांमध्ये गैरसमज परवितात. मला पक्षांची लेबलं लावली जातात. मात्र मी कधीच कोणत्या पक्षाकडे गेलो नाही आणि जाणार नाही. केवळ देशाच्या हितासाठी काम करीत राहणार,’ असे अण्णांनी सुनावले आहे. पक्षीय पद्धतीवर हजारे यांनी भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘स्वातंत्र्यानंतर अनेक पक्षांची सरकारे आली आणि गेली. मात्र, जनतेला खऱ्या स्वातंत्र्याचा लाभ अद्याप मिळालेला नाही. केवळ सत्ता परिवर्तन होऊन हा बदल होणार नाही. त्यासाठी व्यवस्था परिवर्तन करावे लागेल. स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा घेऊन अनेक राजकीय पक्ष काम करीत आहेत. त्यांच्यावर समाज आणि देशाचा विचार करणाऱ्या समविचारी लोकांचा दबाव गट हवा आहे. हे काम कोणत्याही राजकीय पक्षाकडून होणार नाही. कारण ते सत्ता आणि पैशाच्या दृष्टचक्रात अडकले आहेत. स्वातंत्र्यांसाठी बलिदान दिलेल्यांची त्यांना जाणीव नाही.’

वाचा:

‘जेव्हा मी २५ वर्षांचा युवक होतो तेव्हा माझ्या जीवनात एक ध्येय निश्चित केले की गाव, समाज व देशासाठी काम करणार. एवढी वर्षे मी लढत राहिलो. व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी २०११ मध्ये आम्ही जसे आंदोलन केले तसे करावे लागते. ४५ वर्षांत जे विधेयक होऊ शकले नाही, ते जनशक्तीच्या दबावामुळे शक्य झाले. त्यामुळे सरकारला ते मंजूर करावे लागले होते. आजही व्यवस्था परिवर्तन शक्य आहे, असा विश्वास अण्णांनी व्यक्त केला आहे.

भाजपला अण्णांचा सवाल

गुप्ता यांनी आपली परवानगी न घेता आपले नाव असलेले हे पत्र प्रसारमाध्यमांना का दिले, असा सवाल हजारे यांनी केला आहे. एका बाजूला केंद्र सरकार भ्रष्टाचाराविरोधात काम केल्याचे सांगत असताना भाजप मात्र भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करण्यासाठी माझ्यासारख्या ८३ वर्षाच्या फकिराला का बोलवत आहे? हा विरोधाभास नाही का? असा सवालही अण्णा यांनी उपस्थित केला आहे. भाजप हा देशातील सर्वांत मोठा पक्ष आहे. या पक्षात युवकांची संख्या जास्त आहे. मी जेव्हा युवक होतो, तेव्हा मी हे काम सुरू केलेले आहे. एक युवक एवढे काम करू शकतो तर यांना का शक्य नाही?, अशी विचारणाही अण्णांनी केली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here