रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर रत्नागिरी जिल्ह्यातही पदाधिकार्‍यांनी खळखट्ट्याक करण्यास सुरुवात केल्याने १६ जणांवर विविध तोडफोड प्रकरणात अटकेची कारवाई करण्यात आली आहे. तर जिल्ह्यात सगळ्या तालुक्यातील ९७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. विविध ठिकाणी आंदोलने आणि तोडफोड करण्यात आहे.
मुंबई गोवा महामार्ग प्रश्नी मनसेचं आजही खळखट्ट्याक, काल कंपनीचं कार्यालय आज मनसैनिकांनी टोलनाका फोडला
रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर हातीवली टोल नाका फोडल्यानंतर रात्री उशिरा रत्नागिरीतील पाली येथील तोडफोड करण्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अतिरिक्त जिल्हा परिषद जयश्री गायकवाड यांच्या प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. रायगड येथे झालेल्या तोडफोडीनंतर दक्षिण रत्नागिरीतील पदाधिकारीही आक्रमक झाले आहेत. गुरुवारी रात्री राजापूर हातिवले येथे मनसेच्या पदाधिकार्‍यांनी टोलनाक्याची तोडफोड करीत घोषणाबाजी केली. त्यानंतर रत्नागिरी तालुक्यातील खानू येथे ह्यान इन्फ्रा सोल्यूशन प्रा.लि. या कंपनीचे कंटेनर येथील कार्यालयाची तोडफोड केली. यावेळी पाचजणांनी घोषणाबाजी करत पळ काढला. याचा व्हिडीओही मनसे पदाधिकार्‍यांनी त्यानंतर व्हायरल केला होता.

मनसे कार्यकर्त्यांचा भारतीय राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न, पोलिसांनी घेतलं ताब्यात

हा प्रकार घडलेला असतानाच शुक्रवारी दुपारी ११ वा. पालीजवळील उभी धोंड येथे एका जेसीबीची मनसेच्या पदाधिकार्‍यांनी तोडफोड केली. अद्वैत सतीश कुलकर्णी, मनसे शहर अध्यक्ष, अभ्युदय नगर, अविनाश धोंडू सौंदळकर, दक्षिण जिल्हा अध्यक्ष रा. नाचणे रोड रत्नागिरी, रुपेश श्रीकांत चव्हाण रा. कोकण नगर, रत्नागिरी, राजू शंकर पाचकुडे रा. नरबे करबुडे, विशाल चव्हाण रा. भोके,अजिंक्य महादेव केसरकर रा. धवल कॉम्प्लेक्स, रत्नागिरी, कौस्तुभ विश्वनाथ केळकर रा. कोंडगाव साखरपा, देवरुख, सतीश चंद्रकांत खामकर रा. गणेश नगर, कुवारबाव,सुशांत काशिनाथ घडशी रा. कारवांचीवाडी, मनीष विलास पाथरे रा. काळाचौकी मुंबई, सुनील राजाराम साळवी, रा. नाचणे रोड रत्नागिरी,महेश दत्ताराम घाणेकर रा. देऊड, महेश गणपत घाणेकर रा. जाकादेवी, रुपेश मोहन जाधव, रा. कोसुंभ, संगमेश्वर सध्या मारुती मंदिर रत्नागिरी यांचा समवेश आहे. दरम्यान हातिवले येथील तोडफोड प्रकरणी दोन पदाधिकाऱ्यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आली आहे. अशी माहिती रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here