बेळगाव, कर्नाटक: पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्वातंत्र्यदिनी बेळगाव जिल्हा आणि बेळगाव तालुक्याच्या विभाजनाची घोषणा केली असून यामुळे बेळगाव जिल्हा हा ३ भागात विभागला जाणार आहे. बेळगाव, गोकाक, चिकोडी असे जिल्हे निर्माण होणार आहेत. या संदर्भात कर्नाटकच्या हिवाळी अधिवेशनात प्रस्ताव ठेवण्यात येण्याची ही शक्यता वर्तवण्यात येत असून यामुळे गेल्या तीस वर्षांपासून सुरू असलेल्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.
कर्नाटकच्या बागलकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानं तणाव, कारण समोर,नेमकं काय घडलं?
एका बाजूला गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरू असतानाच आता बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करण्यात येणार असल्याचे बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी म्हटले आहे. यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हा पुन्हा भेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून बेळगावचे तीन भागात विभाजन करण्यात येणार आहे. यामध्ये बेळगाव जिल्हा, गोकाक जिल्हा आणि चिकोडी जिल्हा असे विभाजन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले आहे. कर्नाटकातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून बेळगावची ओळख आहे.

४७ लाखांहून अधिकची लोकसंख्या आणि १८ विधानसभा मतदारसंघ आणि 3 लोकसभा मतदारसंघ असून बेळगाव हा सध्या राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. त्यात १५ तालुके, ५०६ ग्रामपंचायती, ३४५ तालुका पंचायत सदस्य आणि १०१ जिल्हा पंचायत सदस्यांचा समावेश आहे असून बेळगाव इतका मोठा जिल्हा असून ही विकासाच्या बाबतीत मागासलेला जिल्हा मानला जातो. येथे प्रामुख्याने मराठी, कन्नड आणि हिंदी भाषिक जास्त राहत असलेल्या या जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी प्रथम जे.एच. पटेल यांनी १९८० मध्ये मांडली. यावेळी चिकोडी हा स्वतंत्र जिल्हा व्हावा ही मागणी होत होती.

अधिकारी पैसे घेत असतील तर चपलेने मारा; अजितदादांच्या आमदारांचा शेतकऱ्यांना सल्ला

मात्र १९९७ नंतर या मागणीने जोर पकडला. मात्र यामुळे गोकाक येथील नागरिकांनी आणि नेत्यांनी गोकाक ही जिल्हा करावा, अशी मागणी केल्याने गोकाक आणि चिकोडी यामध्ये वाद निर्माण झाला. यामुळे आता बेळगाव जिल्ह्याचे बेळगाव, चिकोडी आणि गोकाक या तीन जिल्ह्यांमध्ये विभाजन करण्याचा प्रस्ताव ठेवला असल्याच्या जारकीहोळी यांनी सांगितले आहे. याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे संकेत दिले आहेत. शिवाय येत्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा मांडण्यात येणार असल्याच्या ही चर्चा सध्या सुरू असून यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सुरू असलेला सीमावाद हा पुन्हा उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

• नवीन जिल्ह्यांची रचना पुढीलप्रमाणे केली जाईल:
१)बेळगाव जिल्ह्याचे बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, यमकनमर्डी, हुक्केरी आणि खानापूर असे विभाजन केले जाईल.
२)गोकाक/बैलहोंगलमध्ये बैलहोंगल, रामदुर्ग, कित्तूर, गोकाक आणि मुदलगी यांचा समावेश असेल.
३) चिकोडी, अथणी, कागवाड, निपाणी, रायबाग, कुडची या गावांचा समावेश असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here