आयपीएलच्या एका अधिकाऱ्याने आपल्या करोना चाचण्यांबाबतही माहिती सर्वांना दिली आहे. बीसीसीआयने २० ऑगस्टपासून करोना चाचण्या करायला सुरुवात केली. बीसीसीआयने भारतामध्ये एकही करोना चाचणी केली नाही. सर्व खेळाडू युएईमध्ये आल्यावर २० ऑगस्टपासून बीसीसीआयने करोना चाचणी करायला सुरुवात केली. यामध्ये बीसीसीआयने खेळाडूंबरोबरच सपोर्ट स्टाफ, संघ व्यवस्थापन, बीसीसीआय आणि आयपीएलचे कर्मचारी, हॉटेल कर्मचारी या सर्वांची चाचणी केली आहे. आयपीएल संपेपर्यंत या करोनाच्या चाचण्या सुरुच राहणार आहेत.
याबाबत एका आयपीएलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ” २० ऑगस्टपासून आयपीएशी निगडीत सर्व व्यक्तींची करोना चाचणी घेण्यात आली आहे. आतापर्यंत करोना चाचण्या किती झाल्या याची आकडेवारी आलेली नाही. पण संपूर्ण आयपीएलमध्ये २० हजारपेक्षा जास्त करोना चाचण्या बीसीसीआय करणार असल्याचे समजते आहे. प्रत्येक चाचणीसाठी बीसीसीआयने २०० ईडी (म्हणजेच जवळपास ३,९७१ रुपये) मोजावे लागत आहेत. म्हणजे जवळपास २० हजार चाचण्यांसाठी बीसीसीआयला ८ ते १० कोटी रुपये एवढा खर्च येणार आहे. या चाचण्या करण्यासाठी ७५ वैद्यकीय कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडत असल्याचे म्हटले जात आहे.”
युएईला आल्यावर आयपीएलशी निगडीत प्रत्येक व्यक्तीची चाचणी बीसीसीआयने केली. बीसीसीआयने २० ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीमध्ये काही करोना चाचण्या केल्या आहेत. पण आयपीएलमध्ये एकूण २० हजार करोना चाचण्या करण्यात येणार आहेत. आयपीएलसाठी पहिल्यांदा किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ युएईला रवाना झाले होते. त्यामुळे सर्वात आधी त्यांच्या करोना चाचण्या घेण्यात आल्या आणि त्यांच्या संघातील एकालाही करोनाची बाधा नसल्याचे समोर आले होते.
चेन्नईच्या संघातील व्यक्तींचे जेव्हा करोना चाचणीचे अहवाल आले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. कारण एकाच दिवशी चेन्नईच्या संघातील १२ सपोर्ट स्टाफ आणि एका खेळाडूला करोनाची बाधा झाली होती. त्यानंतर शनिवारी चेन्नईच्या संघातील अजून एका खेळाडूला करोना झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पण त्यानंतर मात्र करोनाची एकालाही बाधा झाली नसल्याचे पुढे आले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
I like the valuable information you provide in your articles.
A big thank you for your article.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.