म. टा. प्रतिनिधी, सांगलीः कुपवाड येथे मंगळवारी सकाळी एका तरुणावर मावा न दिल्याच्या रागातून मित्राने कोयत्याने हल्ला केला. केतन किशोर यादव असे जखमीचे नाव आहे. याबाबत त्याने कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्याच्या फिर्यादीवरून शुभम कांबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुपवाड येथील अवधूत कॉलनीमध्ये राहणारा शुभम कांबळे यांने केतन यादव याच्याकडे मावा मागितला होता. मात्र, त्याने मावा देण्यास नकार दिला. तेव्हा रागाच्या भरात येऊन शुभम याने किशोर यादव याच्यावर कोयत्याने हल्ला चढवून त्याला जखमी केले.

जखमी चेतन याने कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्याच्या फिर्यादीवरून शुभम कांबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी किशोर याच्यावर उपचार करण्यात आले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

6 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here